Friday, May 3, 2024
Homeनाशिकपिसाळेल्या लांडग्याचा चौघांवर हल्ला

पिसाळेल्या लांडग्याचा चौघांवर हल्ला

मनमाड ।प्रतिनिधी Manmad

मनमाड पासून जवळ असलेल्या हिसवळ बुद्रुक येथे काल सकाळी पिसाळलेल्या लांडग्याने धुमाकूळ घालत चार जणांवर हल्ला केला.

- Advertisement -

त्यात दोन महिला आणि दोन पुरुष गंभीर जखमी झाले आहे.जखमींना मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे हिसवळ गाव परिसरात खळबळ उडून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हिसवळ परिसरात मोकाट कुत्र्या सोबत आता लांडग्याचा देखील मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढला असून वन विभागाने लांडग्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्चे अधिकारी-कर्मचारी यांनी उपजिल्हा रुग्णालयात जावून जखमीची भेट घेवून त्यांची विचारपूस केली

मनमाड पासून जवळ हिसवळ बुद्रुक गाव असून आज सकाळी मीना आहेर(वय-45),सुनीता पवार(वय 35), जगन आहेर(वय 65) आणि मोहन सोळसे(वय 30) हे चार जण शेतात जात असताना दबा धरून बसलेल्या लांडग्याने त्यांच्यावर हल्ला केला अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे या चौघानी आरडाओरडा केला त्यांचा आवाज ऐकून गावातील तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली त्यामुळे लांडगा पळून गेला.

काही तरुणांनी त्याला लाठ्याकाठ्यानी मारण्याचा प्रयत्न केला मात्र लांडगा जंगलात पसार झाला.चार ही जखमींना मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार केले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या