Saturday, February 8, 2025
Homeक्राईमभंगार वेचणार्‍या महिलेवर हल्ला

भंगार वेचणार्‍या महिलेवर हल्ला

दुकानाला आग लावल्याच्या संशयावरून मारहाण

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

मनमाड रस्त्यावरील कॉटेज कॉर्नर परिसरात मंगळवारी सकाळी भंगार वेचण्यासाठी गेलेल्या तीन महिलांवर एकाने हल्ला केला. या हल्ल्यात एका महिलेच्या हाताला, पायाला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली आहे. तिच्यावर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

तिने उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून अल्ताफ शेख (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात बुधवारी पहाटे मारहाण, अ‍ॅट्रॉसिटी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिध्दार्थनगर परिसरात राहणारी महिला त्यांची जाव व शेजारी राहणार्‍या एका महिलेसह सकाळी भंगार वेचण्यासाठी हिरा पॅलेसच्या शेजारी, कॉटेज कॉर्नर येथे गेल्या होत्या. यावेळी अल्ताफ शेख याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. दोन दिवसांपूर्वी अल्ताफच्या गॅरेजमध्ये आग लागली होती. त्याचा संशय महिलांवर घेतला गेला. त्यामुळे संतप्त झालेल्या अल्ताफने लोखंडी रॉडने फिर्यादीला मारहाण केली. हल्ल्यात त्यांना डाव्या हाताला, मानेवर, पाठीवर आणि पायावर गंभीर दुखापत झाली. तसेच त्यांची जाव आणि शेजारी राहणार्‍या महिलेला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. हल्ल्यानंतर अल्ताफने जातीवाचक शिवीगाळ करत महिलांना धमकी दिली.

अल्ताफने फिर्यादीवर हल्ला केल्यानंतर त्यांचा पाठलाग केला. फिर्यादी प्राण वाचवण्यासाठी पळाल्या, पण त्याने त्यांना पकडून पुन्हा मारहाण केली. त्यावेळी एका वॉचमन आणि त्यांच्या पत्नीने हस्तक्षेप करून फिर्यादीला वाचवले. त्यानंतर अल्ताफ पळून गेला असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलीस उपअधीक्षक अमोल भारती अधिक तपास करत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या