अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
केडगाव येथील एका 36 वर्षीय महिलेला जातीवाचक शिवीगाळ, मारहाण आणि कपडे फाडून लज्जा उत्पन्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून गंगाराम राऊत, सुनिता गंगाराम राऊत, अवधूत गंगाराम राऊत आणि दीपक गंगाराम राऊत यांच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
26 जुलै 2025 रोजी सकाळी वैष्णवनगर चौकात महिला दुकानात जात असताना अवधूत राऊत याने तिला चिडवले. याबाबत तक्रार करण्यासाठी ती गंगाराम राऊत याच्या घरी गेली. तिथे गंगाराम यांनी जातीय टिप्पणी केली. सुनिता यांनीही अपमानास्पद बोलून शिवीगाळ केली. यानंतर गंगाराम, सुनिता, अवधूत आणि दीपक यांनी महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अवधूत आणि दीपक यांनी तिचे कपडे फाडले, ज्यामुळे लज्जा उत्पन्न झाली.
तसेच, तक्रार केली तर तुला आणि तुझ्या नवर्याला जीवेे मारू अशी धमकी दिली. या घटनेत महिलेचे गळ्यातील गंठण गहाळ झाले. यापूर्वीही त्यांनी कोतवालीत तक्रार केली होती, परंतु वागणुकीत सुधारणा न झाल्याने पुन्हा फिर्याद दाखल केली. कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून, तपास सुरू आहे.




