उंटावद ता.यावल – वार्ताहर.
वाघझिरा येथील महीलेला सोमवार दि.२४ रोजी शेतात काम करत असतांना सर्पदंश झाला होता या सर्पदंशामुळे महीलेची तब्बेत अतिशय गंभीर झाली होती मात्र तात्काळ किनगाव प्राथमिक आरोग्य केंन्द्रात दाखल केल्याने वैद्यकीय अधिकारी डाँ.तरन्नुम शेख यांनी रूग्णाला (Antiveninom) हे इंजेक्शन दिले व औषधोपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात जळगाव येथे पाठवीले.
या महीलेला भारतातील सर्वात विषारी साप (रसल वायपर) ने दंश केला होता म्हणून महीलेची तब्बेत गंभीर झाली होती. नुकताच पावसाळा सुरू झाला असुन पावसाळ्यात सापांच्या बिड्यात पाणी जाते व साप बाहेर येतात व शेतात काम करीत असतांना किंवा गावातही सर्पदंश होण्याच्या घटना पावसाळ्यात जास्त घडतात तरी नागरीकांनी अश्या सर्पदंशाच्या घटना घडुनये म्हणून सावधगीरी बाळगावी व सर्पदंश झाल्यास तात्काळ रूग्णालयात यावे असे आवाहन किनगाव प्राथमिक आरोग्य केंन्द्राच्या वैद्यकीय अधिकारी डाँ.तरन्नुम शेख यांनी केले आहे.