पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
पारनेर तालुक्यातील एका गावात घरात घुसून विवाहितेच्या गळ्याला चाकू लावून तिच्यावर बळजबरी अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली. सोमवारी (दि.13) दुपारी हा प्रकार घडला. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सागर तुळशीराम मेंगाळ (रा. नागापूरवाडी, पळशी ता. पारनेर) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडितेने पारनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, सोमवारी दुपारी घरी काम करीत असताना आरोपी बळजबरीने घरात घुसला.
पीडित महिला एकटी असल्याचा फायदा घेत आरोपीने तिच्या गळ्याला चाकू लावला. जिवे ठार मारण्याची धमकी देत पीडितेवर बळजबरी अत्याचार केला. त्यानंतर आरोपी तेथून पळून गेला. पीडितेने हा प्रकार नातेवाईकांना सांगितल्यानंतर पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक ए. बी. दंडगव्हाळ करीत आहेत.