मुंबई | Mumbai
दिवंगत अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचे ९ मार्च रोजी निधन झाले होते. होळी खेळून आल्यानंतर त्यांना त्रास होऊ लागला आणि हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचे निधन झाले. दरम्यान, बॉलिवूड अभिनेते सतीश कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणी हत्येचा दावा करणाऱ्या दिल्लीतील महिलेला मुंबईतील न्यायालयाने नुकतंच समन्स बजावला आहे.
सतीश कौशिक यांच्या निधनानंतर दिल्लीतील एका महिलेने दावा केला होता की, पैशाच्या वादामुळे त्यांच्या पत्नीने त्यांना मारलं आहे. त्यानंतर सतीश कौशिक यांच्या पत्नीने त्या महिलेविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती.
आदित्य ठाकरेंचा नोटबंदीवरुन सरकारवर हल्लाबोल; म्हणाले…
त्यावर आता कौशिक यांची पत्नी शशी यांनी “माझे पती सतीश कौशिक यांचे दीन दयाळ उपाध्याय रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. डॉक्टरांनी तसा अहवालही दिला आहे. मात्र, या महिलेच्या चुकीच्या दाव्यामुळे त्यांच्याबाबत गैरसमज निर्माण झाले आहेत. यामुळे आरोपींविरोधात कारवाई करावी”, अशी तक्रार अडव्होकेट मधुकर दळवी यांच्यामार्फत न्यायालयात केली आहे.
सिद्धरामय्या दुसऱ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री, डीके शिवकुमार उपमुख्यमंत्रीपदी विराजमान
त्यानंतर आता या प्रकरणात सतिश कौशिक यांची पत्नी शशी हिच्या तक्रारीवर अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टानं त्या महिलेला समन्स जारी केलं आहे. कोर्टाचं म्हणणं आहे की सतिश कौशिक यांच्या हत्येचा कथित दावा, प्राथमिक तपासात मानहानीचा अपराध वाटत आहे.
“…याला काय अर्थ राहिला आहे का?”; २ हजाराच्या नोटबंदीवर अजितदादांची खास शैलीत टीका
दरम्यान, आता या प्रकरणात कोर्ट पुढील सुनावणी १५ जूनला घेणार असून दिल्ली येथे राहणारी महिला सानवी मालू सोबतच राजेंद्र छाबरा या व्यक्तिला देखील या प्रकरणात समन्स जारी केलं गेलं आहे. सतिश कौशिक यांच्या पत्नीनं तक्रार करताना असं देखील म्हटलं आहे की महिलेनं केलेले दावे खूप अपमानास्पद आहेत आणि कौशिक यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्यासाठी हे सगळं केलं आहे.