नाशिक | प्रतिनिधी Nashik
महामार्ग बसस्थानकात बसमध्ये बसत असताना गर्दीमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत अज्ञात चोरट्यांनी हातोहात लंपास केली.
- Advertisement -
हे देखील वाचा– NCP Sharad Chandra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेते पदी जितेंद्र आव्हाड यांची निवड
सुरेश तुकाराम रणसशिंग (रा. अंबाजीनगर, आरटीओ कॉर्नर, पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार, शनिवारी (दि. ३०) सकाळी अकराच्या सुमारास ते पत्नीसह महामार्ग बसस्थानकात आले होते. दोघेही नाशिक- सोलापूर बसमध्ये बसत असताना गर्दी झाली.
हे देखील वाचा – देशदूत ई पेपर १ डिसेंबर २०२४
बसमध्ये बसल्यानंतर त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील ५० हजारांची सोन्याची पोत चोरट्यांनी लंपास केली. सदर घटनेबाबत मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा