वेळुंजे : त्र्यंबक तालुक्यातील आडगाव देवळा येथील महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली. वेळेत उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागल्याची तक्रार नातेवाईकांनी केली आहे.
पारुबाई मंबाजी चौधरी या आपल्या शेतात काम करीत असतांना दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही घडली.
- Advertisement -
सध्या शेतीचे कामे हे वेगाने चालू असून परिसरात गवत तसेच झाडाझुडपांनी वेढलेला आहे. यावेळी परुबाई शेतात काम करताना त्यांना सर्पदंश झाला. यावेळीचे वेळेवर वाहन न मिळाल्याने त्यांना जीव गमवावा लागला.
अपुऱ्या सोयी सुविधांमुळे आजही अनेक आदिवासी बांधव या पासून वंचित आहेत. जवळपस दवाखाना नासल्याने थेट हरसूल गाठावे लागते. परिणामी साधन न मिळाल्याने रुग्णाला प्राणाला मुकावे लागते. आसपासच्या गावातील लोकांना हरसूल शिवाय पर्याय नसल्याने येथील काही ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.