Friday, May 3, 2024
Homeनाशिकट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून महिला मजुराचा मृत्यू

ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून महिला मजुराचा मृत्यू

नाशिक | Nashik

ट्रॅक्टर च्या चाकाखाली सापडून महिला मजुराचा मृत्यू झाल्याची घटना शिलापूर येथे घडली आहे.

- Advertisement -

येथील ऊसतोड कामगार महिला उत्तम थेटे यांच्या ऊसाच्या शेतात मजुरीसाठी गेली होती. यावेळी ट्रॅक्टर चालक हा ट्रॅक्टर मागे घेत होता. यावेळी ट्रॅक्टर च्या मागे ही महिला उभी होती. यामध्ये महिला मजूर चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाली.

यानंतर तिला तातडीने जिल्हा रुग्णालय नाशिक येथे दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. याबाबत गुन्हा आडगाव पोलिसांनी नोंदवला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या