Thursday, September 19, 2024
HomeनाशिकNashik Crime News : १२ लाखांची मंगळसूत्रे ओरबाडली

Nashik Crime News : १२ लाखांची मंगळसूत्रे ओरबाडली

नाशिकसह भिवंडी, श्रीरामपूरचे चेनस्नॅचर्स मालामाल, तपास थंडावला

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

शहरातील महिला वर्गास मंगळसूत्रे (Mangalsutra) घालून बाहेर पडणेही धाेक्याचे झाले आहे. कारण, जुलै महिन्यांत १५ ते २० विवाहितांचे मंगळसूत्रे दुचाकीवरील चेनस्नॅचर्सने ओरबाडून नेले आहेत. विशेष म्हणजे या घटनांत १२ ते १३ लाख रुपयांचे २१ ताेळे वजनाचे मंगळसूत्रे, मनी खेचून नेण्यात आले आहेत. दरम्यान, घडलेल्या चेनस्नॅचिंगमधील एकही चाेरटा पाेलिसांच्या (Police) हाती लागला नसून गुन्ह्यांचा तपासही थंडावला आहे. 

हे देखील वाचा : Nashik News : व्ही. एन. नाईक संस्थेवर ‘प्रगती’ चा झेंडा; अध्यक्षपदी कोंडाजीमामा आव्हाड विजयी

शहरात जबरी चोरीचे प्रमाण वाढत असून दुचाकीस्वार चोरटे काही क्षणात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने, नागरिकांचे मोबाइल, रोकड हिसकावून नेत आहेत. १ ते २७ जुलै दरम्यान, घडलेल्या घटनांबाबत जबरी चोरीचे १५ गुन्हे दाखल असून म्हसरुळ, इंदिरानगर, पंचवटी, मुंबईनाका, अंबड, नाशिकरोड, उपनगर या पोलिस ठाण्यांमध्ये जबरी चोरीचे प्रकार घडले आहेत. सारडा सर्कल (Sarda Circle) येथे शनिवारी (दि.२७) सकाळी सव्वा सातच्या सुमारास निर्मला पंडित मोकासे (रा. जुने नाशिक) यांच्या गळ्यातील ४५ हजार रुपयांची दीड तोळे वजनाची सोन्याची पोत दुचाकीस्वार चोरट्यांनी ओरबाडून नेली. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात (Mumbai Naka Police Station) जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

हे देखील वाचा : सर्पदंश झालेल्या पत्नीला वाचविण्यासाठी पतीने खांद्यावर नेत पुराच्या पाण्यातून काढली वाट

तर मखमलाबाद म्हसरुळ लिंकरोडवरील मधुरा स्वीट्ससमोर दुचाकीस्वार चोरट्यांनी मिना लहानू खरे (रा. म्हसरुळ) यांच्या गळ्यातील १ लाख २० हजार रुपयांची दीड तोळे वजनाची पोत शनिवारी सकाळी सव्वा सातच्या सुमारास ओरबाडून नेली. याप्रकरणी म्हसरुळ पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे. या दोन घटनांवरून शहरात सोनसाखळी ओरबाडणारे चोरटे सक्रिय झाल्याचे बोलले जात आहे. सकाळी व रात्रीच्या वेळी गर्दी नसलेल्या भागात पादचारी महिलांना लक्ष करून हे चोरटे सोन्याचे दागिने ओरबाडून नेत आहेत. त्याचप्रमाणे काही चोरटे महागडे मोबाइल, रोकडही ओरबाडून नेत असल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटना कमी झाल्या नसून नाशिक शहरासह जिल्ह्यातील तसेच श्रीरामपूर, अंबरनाथ, भिवंडी, ठाणे येथील चेनस्नॅचर या गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे समाेर आले आहे. 

हे देखील वाचा : Nashik News : प्रादेशिक परिवहन विभागाकडून मद्यप्राशन करणाऱ्यांवर कारवाई

गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना अपेक्षित यश नाही

दाखल गुन्ह्यांनुसार चोरट्यांनी (Theft) जुलै महिन्यात २१५ ग्रॅम वजनाचे साेन्याचे दागिने ओरबाडून नेले आहेत. तर, एका गुन्ह्यात ४० हजार रुपयांचा मोबाइल ओरबाडून नेला आहे. या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना अपेक्षित यश आलेले नसल्याने चोरटे एकापाठोपाठ एक चेनस्नेचिंग करीत आहेत. 

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या