Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशभारतातील लसीकरणाचे वर्ल्ड बँकेच्या अध्यक्षांकडून कौतुक; म्हणाले...

भारतातील लसीकरणाचे वर्ल्ड बँकेच्या अध्यक्षांकडून कौतुक; म्हणाले…

वॉशिंग्टन | Washington

करोनाविरूद्धच्या (corona) यशस्वी लसीकरणासाठी (vaccination) जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास (david malpass) यांनी भारताचे अभिनंदन केले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (nirmala sitharaman) यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी लस उत्पादन आणि वितरणाच्या आंतरराष्ट्रीय भूमिकेबद्दल भारताचे आभार मानले आहेत….

- Advertisement -

सानिया मिर्झा सोशल मीडियापासून लांब राहणार, कारण…

सीतारामन यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान, मालपास यांनी वॉशिंग्टनस्थित आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आणि बहुपक्षीय गुंतवणूक हमी एजन्सीच्या आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळासह जागतिक बँक समूहाच्या सर्व घटकांमध्ये भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

डेविड मालपास म्हणाले की, इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशनने भारताच्या सक्रिय योगदानाचे कौतुक केले. त्यांनी अशी अपेक्षा केली आहे की, भारत यापुढेसुद्धा आपली निर्णायक भुमिका कायम ठेवेल.

याशिवाय भारतीय अर्थव्यवस्थेवरदेखील चर्चा करण्यात आली. वर्ल्ड बँकेच्या अध्यक्षांनी भारताने काळानुसार महत्वपूर्ण बदल केल्याच्या गोष्टीवर आनंद व्यक्त केला. तर वर्ल्ड बँकेकडून भारताला सर्व प्रकारची मदत केली जाईल, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, देशात आतापर्यंत 97 कोटीहून अधिक नागरिकांना करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. देशात साधारण 70 टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. तर 30 टक्के नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या