नवी दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi
भारताचा 18 वर्षीय बुद्धिबळपटू डी गुकेश विश्वविजेता बनला आहे. यासह त्यांनी इतिहास रचला आहे.जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत भारताने इतिहास रचला आहे. यात डी गुकेश विश्वविजेता ठरला आहे.
- Advertisement -
डी गुकेशने चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून जागतिक विजेतेपद पटकावले.भारताच्या 18 वर्षीय ग्रँडमास्टर गुकेशने 14व्या आणि अंतिम सामन्यात चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करत जागतिक विजेतेपदाचा मान मिळवला.
विश्वनाथन आनंद नंतर जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारा गुकेश हा दुसरा भारतीय ठरला आहे. जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद लढतीत १३व्या डावापर्यंत दोघांचे ६.५ इतके गुण झाले होते. आज अखेरची १४वी आणि निर्णायक लढत होती.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा