Friday, September 20, 2024
HomeनाशिकWorld Left-Handers Day Special : डावखुर्‍यांच्या समस्येबाबत जागरूकता व्हावी

World Left-Handers Day Special : डावखुर्‍यांच्या समस्येबाबत जागरूकता व्हावी

- Advertisement -

नाशिक । नरेंद्र जोशी

88 टक्के उजव्या हाताच्या लोकांचे वर्चस्व असलेल्या जगात 12 टक्के डावखुरे आहेत. आज (दि.13) या डावखुर्‍यांंचा लेफ्टहँडर्स डे साजरा झाला. डाव्या हातांना त्यांच्या दैनंदिन जीवनात भेडसावणार्‍या समस्यांबद्दल जागरुकता या निमित्ताने व्हावी, असा प्रयत्न आहे.

हा दिवस सर्वप्रथम लेफ्टहँडर्स इंटरनॅशनलचे संस्थापक – डीन आर. कॅम्पबेल यांनी 1976 मध्ये साजरा केला होता. त्यानंतर 1990 मध्ये लेप्टीज क्लबची स्थापना झाली आणि 1992 पासून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. यंंदाचा हा 31हा डावखुरा दिन आहे. सन 1600 च्या दशकापासून डाव्या हाताच्या लोकांबद्दल बरेच गैरसमज आहे. तेव्हापासून आजपर्यंत, त्यांना आव्हानांचा सामना करावा लागत आहे. नाशिकमध्ये गेल्या 15 वर्षांपासून ही चळवळ क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या निवृत्त शिक्षिका नयना आव्हाड चालवत आहेत.

लेफ्ट-हँडर्स क्लबची स्थापना 1990 मध्ये डावखुरे आणि उत्पादक यांच्या विचारांमध्ये काम करण्यासाठी झाली. क्लब डाव्या हाताच्या आणि नवीन वस्तूंवर सतत संशोधन करतो. जे लेफ्टीजना वापरण्यास सुलभ होऊ शकतील. आज बहुतांशी वस्तुंची रचना ही उजव्या हाताला गृहीत धरुन होते. शाळेचा डेस्क, कात्री हे त्याचे मूर्तीमंंत उदाहरण आहे. मात्र डावखुर्‍यांचा फारसा विचार होत नाही. या दिनाच्या निमित्ताने त्याची जाणिव समाजाला करुन दिली जात आहे.

नामवंत डावखुर्‍या व्यक्ती
महात्मा गांधी, भारतरत्न मदर तेरेसा, अमेरिकचे माजी अध्यक्ष बराक ओबामा, वॉल्ट डिस्ने, जगातील सर्वत श्रींमंत बिल गेट्स, चार्ली चॅप्लिन, मार्क झुकेरबर्ग आणि अल्बर्ट आइनस्टाईन, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, जहीर खान, इरफान पठाण यासारख्या महान लोकांनी डाव्या हातानेच कर्तृत्व गाजवले आहे. बिल गेट्स जगातील सर्वात श्रीमंत डावखुरे व्यक्ती बनलेे.

धार्मिक विधीच्या वेळी हमखास डावखुर्‍यांंची मोठी अडचण होते. भरतनाट्यम, कथ्थकच्या स्टेप्सही उजव्या बाजूने शिकवल्या जातात. तेथेे डावखुर्‍यांंची अडचण होते. हस्तांदोलन करताना नेहमीच गोंधळ उडतो. सर्वत्र यंंत्र, साहित्याची रचना उजव्या हाताच्या हिशोबाने केली जात असल्याने डावखुर्‍यांना काम करताना वेळ लागतो. याची जाणिव यानिमित्ताने करुन देण्याचा प्रयत्न आम्ही करतो.
-नयना आव्हाड, अध्यक्ष लेप्टहॅण्डर्स क्लब, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या