Friday, May 3, 2024
HomeUncategorizedजागतिक दुग्ध दिन : दुध.. दुध...दुध..पियो ग्लासभर

जागतिक दुग्ध दिन : दुध.. दुध…दुध..पियो ग्लासभर

आज (1 जून) जगभरात जागतिक दूध दिवस साजरा केला जातो. दूध हा एक जीवनावश्यक घटक मानला जातो. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच दूधाची आवश्यकता असते. पाण्यानंतर प्यायला जाणारा दूध हाच एकमेव पदार्थ असावा. मानवी शरीराला दुधाची असलेली गरज आणि त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठीच जागतिक दूध दिन साजरा केला जातो.

प्रत्येक वर्षी जगभरात 1 जून या दिवशी जागतिक दुग्ध दिन साजरा केला जातो. 2001 पासून जागतिक दुग्ध दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. 1 जून या दिवशीच दुध दिवस साजरा करण्यात येऊ लागला याचे कारण असे की, अनेक देशांमध्ये याच तारखेला दुग्ध दिवस साजरा केला जात असे. सर्वासामान्य नागरिकांना दूधाबद्दल माहिती कळावी आणि जगभराती देशांना दुधाचे महत्त्व ध्यान्यात यावे यासाठी हा दिवस साजरा करण्यात येऊ लागला. जगभरात जरी 1 जून जागतिक दूध दिवस म्हणून साजरी केला जात असला तरी भारतात 26 नोव्हेंबरला राष्ट्रीय दूध दिवस म्हणून साजरी केला जातो. देशात राष्ट्रीय दूध दिवस पहिल्यांदा 26 नोव्हेंबर 2014 ला साजरी केला गेला होता. हा दिवस वर्गीस कुरीयन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो, हे भारतातील श्वेत क्रातींचे जनक आहेत.

- Advertisement -

दूध हा पदार्थ आपल्या आयुष्यात महत्त्वाचा घटक आहे. कारण, ते मानवी शरीराला आवश्यक असे महत्त्वाचे घटक उपलब्ध करुन देऊ शकतो. दूध प्रत्येकाच्या आरोग्यसाठी गरजेचे असते. ही माहिती लोकांपर्यंत पोचवण्यासाठीच हा दिवस साजरी केला जातो. दुधापासून आपल्याला चांगले पोषण मिळते तसेच दूधाचा समावेश आहारात केल्यास त्याचे अनेक फायदेही आहेत. दूधामध्ये मानवी शरीरास पोषक कॅल्शियम, मॅगनिशियम, झिंक, फॉस्फरस, आयोडीन, आयर्न, पोटॅशियम, फोलेट्स, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी12, प्रोटीन असे अनेक घटक असतात. याबरोबरच दुधाच्या उत्पादनाच्या क्षेत्रात स्थिरता, उपजीविका आणि आर्थिक विकासास प्रोत्साहन देणे हा ही एक महत्त्वाचा उद्देश आहे.

दूध हा अधिक ऊर्जा देणारा पदार्थ आहे. लहान मुले, आजारी व्यक्ती, वृद्ध यांना पोषणासाठी दुध अत्यावश्यक आहे. यातील विविध पोषक घटकांमुळे मुले गुटगुटीत होतात. आजारी व्यक्तींना आजारपणातून लवकर मुक्तता होते. गर्भवती स्त्रीयांनाही दुध पुर्णान्न आहे. पोटातील बाळाचे दुधामुळे पोषण होते. दुध प्यायल्याने मानवी शरीरात कमी वेळात जास्त उर्जा उत्पन्न होऊ शकते. कारण, दुधात अधिक मात्रेत प्रोटीन असते. जगभरातील अनेक देश दूध उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. भारतातही धवलक्रांती म्हणजेच दूध वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य सरकारच्या माध्यमातून केले जाते.

या उद्योगासमोर काही आव्हानेही आहेत. अलीकडच्या काही वर्षांमध्ये बेकायदेशीररीत्या बनवलेले रासायनिक दूध, दुधात वेगवेगळ्या प्रकारची रसायने आणि अयोग्य पदार्थ मिसळण्याचे प्रकार वाढले आहेत. सुट़या दुधामध्ये भेसळीची शक्यता अधिक आहे. ही बाब अतिभयंकर आणि सामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळ करणारी आहे. दुधापासून खवा, पेढे, बर्फी तयार करणार्‍या मिठाईच्या कारखान्यावरही अचानक छापे घातले असता खव्यातही युरिया, मीठ, ग्लुकोज, स्टार्च, खाण्याचा सोडा मिसळला जात असल्याचे उघडकीस आले आहे. या तुलनेत पकडलेल्या गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण कमी आहे वा किरकोळ स्वरूपाच्या शिक्षा झाल्याने हेच लोक नव्या जोमाने दुधाच्या धंद्यातून आपली मिळकत वाढवतात.

दूध नाशवंत पदार्थ असल्याने त्याचे योग्य पद्धतीने संकलन केल्यास ते फार काळ टीकू शकते. यासाठी दूध संकलनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा बनतो. शिवाय दूध संकलनावेळी स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी दूध काढल्यानंतर शक्यतो त्वरित 4 अंश सेल्सिअस तापमानाला साठवणे आवश्यक आहे. जागतिक मानांकानुसार दुधामध्ये प्रतिमिलि 1 लाखापेक्षा जास्त जिवाणू असतील तर असे दूध स्वीकारले जात नाही. पाश्चात्त्य देशात चांगल्या प्रतीची दूधनिर्मिती करणार्‍यांना त्याचा मोबदला मिळतो.

तर अस्वच्छ दूध देणार्‍या उत्पादकाचे दूध स्वीकारणे बंद केले जाते. भारतात मात्र दुधाच्या स्वच्छतेबाबत उदासीनता आढळते. निर्जंतुक दूध उत्पादनाकडे उत्पादक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. त्यामुळे संकलीत दूध स्वीकारताना काही महत्त्वाच्या निकषांचे पालन होणे गरजेचे आहे. संकलित दुधाचा स्वीकार करताना दुधातील फॅट्स आणि डिग्रीचा विचार केला जातो. मात्र, दुधाच्या स्वच्छतेकडे दूर्लक्ष केले जाते. आवश्यकतेपेक्षा अधिक पाणी मिसळणे, दुधाच्या भूकटीचा वापर करणे, युरिया आदी रसायनांपासून दुध उत्पादीत करणे आदी भेसळीचे प्रकार अन्न व औषध प्रशासनाच्या नेहमीच रडारवर असतात. मात्र, तरीही दुधातील भेसळीचा प्रकार राजरोसपणे सुरूच असतो. दुध भेसळीच्या याप्रकारास लवकर लगाम घातलेला बरा अन्यथा याचे भयंकर परिणाम येणार्‍या पिढीस नक्कीस भोगावे लागतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या