Sunday, November 3, 2024
HomeUncategorizedछत्रपती संभाजीनगरात जागतिक पर्यटन परिषद

छत्रपती संभाजीनगरात जागतिक पर्यटन परिषद

छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar

जिल्ह्यात विविध पर्यटनस्थळ (tourist spot) असून, पर्यटन वाढीसाठी जिल्हा प्रशासन (District Administration) विविध उपक्रम राबवित आहे. सप्टेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय पर्यटन परिषदेचे आयोजन छत्रपती संभाजीनगर शहरात करण्यात आले आहे. तसेच वेरूळ महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. हे दोन्ही उपक्रम जिल्ह्यासाठी पर्यटन विकासातील महत्वाचे पाऊल आहे. यासाठी जिल्हा प्रशासन, महापालिका, पोलीस यंत्रणा आणि पर्यटन विभाग समन्वयाने काम करणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय (Collector Astik Kumar Pandey) यांनी भारत पर्यटन चालक एजन्सी सदस्याच्या आढावा बैठकीत दिली.

- Advertisement -

या बैठकीत महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पर्यटनचे प्रादेशिक उपसंचालक विजय जाधव, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक संतोष झगडे, छत्रपती संभाजीनगर पर्यटन विकास संस्थेचे जसवंत सिंग यांच्यासह राजीव मेहरा, रवी गोसावी आदी पर्यटन श्रेत्रातील संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सप्टेंबर २०२३ मध्ये होणाऱ्या जागतिक पर्यटन परिषदेचे आयोजन छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात येणार असून यामध्ये एक हजार टूर ऑपरेटरचा सहभाग राहणार असल्याने त्यांच्या  राहण्याच्या व इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत संबधित विभागांना सूचित करण्यात आले आहे. यासाठी महापालिकेकडून कार्यक्रम स्थळाचे फायर ऑडिट करून सुरक्षेबाबतची कार्यवाही करावी. तसेच शहराचे ब्रॅण्डिंग करण्यासाठी डिजिटल होर्डिंगच्या माध्यमातून जिल्ह्यातील पर्यटनस्थळ, संस्कृती याविषयची माहिती देण्याबरोबर निमंत्रितांचे स्वागत, आदरतिथ्य करण्याबाबत तयारीचा आढावा यावेळी जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी घेतला.

या आढावा बैठकीत मुंबईतून दूरदृष्य प्रणालीद्वारे लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त दिलीप शिंदे यांनी सहभाग घेतला होता. यावेळी वेरूळ महोत्सव शक्य तो सुट्टीच्या काळात आयोजित करावा, जेणेकरून पालक, विद्यार्थी अधिक संख्येने सहभागी होतील, अशी सूचना शिंदे यांनी जिल्हा प्रशासनास केली. यावेळी पर्यटन परिषद आणि वेरूळ महोत्सवादरम्यान सांस्कृतिक आयोजनाबाबतही चर्चा करण्यात आली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या