Friday, May 3, 2024
Homeनाशिकजागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध ऑनलाईन कार्यक्रम

जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध ऑनलाईन कार्यक्रम

वेळुंजे । देवचंद महाले

राज्यातील शिक्षकांना ऑनलाईन तंत्र प्रशिक्षण व विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवणारे नेटवर्क तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र यांच्या वतीने ९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध ऑनलाईन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

- Advertisement -

दिनांक ७ ऑगस्ट ते ९ ऑगस्ट असे सलग चार दिवस रोज रात्री ९ वाजता युट्यूब लाईव्ह द्वारे हे कार्यक्रम असतील. यासाठी तंत्रस्नेही शिक्षक समूहाचे सर्व व्हाट्स अॅप गट, टेलिग्राम, फेसबुक व ब्लॉग या समाज माध्यमातून या कार्यक्रमाचे प्रसारण होणार आहे.

लाईव्ह कार्यक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. इयत्तेनिहाय तीन गटात ही स्पर्धा आयोजित केली आहे. दोन्ही स्पर्धेसाठी आदिवासी संस्कृती व महापुरुष या पैकी एक विषय असेल स्पर्धेत सहभागी होण्यासाठी http://tiny.cc/TSS-Drawing लिंक चा वापर करावा, तर निबंध स्पर्धे साठी http://tiny.cc/TSS-Essay या लिंकचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तीन दिवसीय कार्यक्रम

दि. ७ ऑगस्ट रोजी श्रीमती वर्षा सानप (सहा.प्रकल्प अधिकारी शिक्षण, अप्पर आयुक्त कार्यालय नाशिक, आदिवासी विकास विभाग)

विषय- आदिवासी कल्याणकारी योजना.

दि. ८ ऑगस्ट श्री.देवाजी तोफा, लेखा-मेंढा गडचिरोली

विषय- आमचे गाव,आमचे सरकार

दि. ९ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता निबंध व चित्रकला स्पर्धा डिजिटल प्रमाणपत्र वितरण व त्यानंतर ९:३० वाजता श्री.तुकाराम चौधरी, (नवोदित लेखक नाशिक)

विषय- आदिवासी संस्कृती सद्यःस्थिती व गती

- Advertisment -

ताज्या बातम्या