Monday, May 6, 2024
Homeदेश विदेश'या' ठिकाणी जगातील सर्वात मोठ्या खादी तिरंग्याचं अनावरण, पाहा व्हिडिओ

‘या’ ठिकाणी जगातील सर्वात मोठ्या खादी तिरंग्याचं अनावरण, पाहा व्हिडिओ

लेह | Leh

लेहमध्ये आज जगातील सर्वात मोठ्या खादी राष्ट्रध्वजाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. लद्दाखचे उपराज्यपाल आरके माथुर यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलं आहे. यावेळी सेना प्रमुख जनरल एमएम नरवणे देखील उपस्थित होते. महात्मा गांधीजींच्या 152 व्या जयंतीनिमित्ताने हा तिरंगा तिथे लावण्यात आला आहे.

- Advertisement -

भारतीय लष्कराच्या 57 इंजिनीअर रेजिमेंटच्या 150 जवानांनी हा खादीचा ध्वज टेकडीच्या शिखरावर नेला. लेह, लडाखमध्ये जमिनीच्या पातळीपासून 2000 फूट उंचीवर एका टेकडीच्या शिखरावर नेण्यासाठी सैन्याला वर पोहोचण्यास दोन तास लागले.

काय आहेत या ध्वजाची वैशिष्ट्ये?

या ध्वजाची लांबी तब्बल 225 फूट आहे. तर ध्वजाची रुंदी 150 फूट इतकी आहे. हा ध्वज पूर्णपणे खादीचा असून त्याचं वजन तब्बल 1 हजार किलो इतकं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या