Friday, November 22, 2024
Homeमुख्य बातम्याWorli Hit and Run Case : मुख्य आरोपी मिहीर शाहला 'इतक्या' दिवसांची...

Worli Hit and Run Case : मुख्य आरोपी मिहीर शाहला ‘इतक्या’ दिवसांची पोलीस कोठडी

मुंबई | Mumbai

वरळीतील हिट अँड रन प्रकरणात मुख्य आरोपी मिहीर शाहला (Mihir Shah) १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली आहे. काल मंगळवारी (दि.९) रोजी त्याला विरार येथून मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली होती. यानंतर आज त्याला शिवडी कोर्टात हजर केले असता न्यायालयाने (Court) त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शाहाला पोलिसांनी केली अटक

आजच्या सुनावणीत सरकारी वकील आणि मिहीरच्या वकिलांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले.मिहीरला पोलीस कोठडी मिळावी म्हणून सरकारी वकिलांनी विनंती केली होती.परंतु, मिहीरची सर्व चौकशी पूर्ण झालेली आहे, त्यामुळे त्याला आता कोठडीची (Custody) गरज नाही, असा युक्तीवाद मिहीरच्या वकिलांनी केला. यानंतर कोर्टाने मुख्य आरोपी मिहीर शाह याला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात येत असल्याचे म्हटले.

हे देखील वाचा : Nashik Crime News : म्हसरुळला भरदिवसा वृद्ध महिलेचा खून

यावेळी आरोपी मिहीरच्या वकिलांनी युक्तिवाद करत म्हटले की, “गुन्ह्यातील कार पोलिसांनी जप्त केलेली आहे. कारने समोरून धडक दिली होती तेव्हाच गाडीची नंबरप्लेट तुटून खाली पडली होती. यांनी फक्त ती उचलून गाडीत ठेवली. मिहीरला काल दुपारी ३ वाजता अटक झाली, मेडिकल झालेले आहे.तपास पूर्ण झाला असून आता पोलीस कोठडीची गरज आहे, असे आम्हाला वाटत नाही. घटनास्थळावरही आरोपीला नेण्यात आले आणि तपास करण्यात आला.आता अजून काय तपास करायचा शिल्लक आहे? आरोपीची जे जे रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. अटकेची माहिती आरोपीचे वडील राजेश शाह यांना देण्यात आली होती”, असा युक्तिवाद वकिलांनी केला.

हे देखील वाचा : विधानपरिषद निवडणुक : क्रॉस वोटिंगचा धसका! सत्ताधारी आणि विरोधकांकडून ‘हॉटेल पॉलिटिक्स’

तसेच, सरकारी वकिल युक्तिवाद करतांना म्हणाले की, “गुन्हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असून तपास अगदी प्राथमिक टप्प्यावर आहे. त्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त पोलीस कोठडीची आवश्यकता आहे”, असे म्हटले. यावर मिहीरच्या वकिलांनी सवाल करत म्हटले की, “उद्या एका आरोपीची पोलीस कोठडी संपते आहे. त्यात तुम्ही प्रगती सांगा. तपासात काय निष्पन्न झाले ते सांगा आणि मग जास्त कोठडीची मागणी करा. मिहीरला एक दिवस पोलीस कोठडीत ठेवा आणि उद्या तपासात काय प्रगती आहे ते सांगा”, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला.

हे देखील वाचा : अंगावर काटा आणणारा अपघात! दुधाच्या टँकरला बसची भीषण धडक, १८ जणांचा मृत्यू

नेमकं प्रकरण काय?

७ जुलै रोजी वरळीच्या कोळीवाड्यात बीएमडब्ल्यू या अलिशान गाडीने दुचाकीवर असलेल्या एका जोडप्याला उडवले. या अपघातात दुचाकीवरील पुरुष एका बाजूला जाऊन पडला. तर महिला गाडीच्या बोनेटवर अडकली. बोनेटवर अडकलेल्या महिलेला कारचालकाने जवळपास एक ते दीड किमी फरफटत नेले. तसेच, तिच्या अंगावरून गाडी नेली. या क्रूर प्रकारानंतर या गाडीचा चालक आणि मालक घटनास्थळावरून फरार झाले होते. त्यानंतर काल मुंबई पोलिसांनी त्यांना विरार येथून अटक केली होती. त्यानंतर आज शिवडी कोर्टात हजर करण्यात आले असता मिहीर शाहला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हे देखील वाचा : घटस्फोटीत मुस्लीम महिलांसंबंधी सुप्रिम कोर्टाचा ‘हा’ महत्वाचा निर्णय

पीडित कुटुंबाला १० लाखांची आर्थिक मदत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांशी बोलताना पीडित कुटुंबाला १० लाखांची आर्थिक मदत करणार असल्याचे जाहीर केले.

व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या