Tuesday, July 23, 2024
HomeUncategorizedविधानपरिषद निवडणुक : क्रॉस वोटिंगचा धसका! सत्ताधारी आणि विरोधकांकडून 'हॉटेल पॉलिटिक्स'

विधानपरिषद निवडणुक : क्रॉस वोटिंगचा धसका! सत्ताधारी आणि विरोधकांकडून ‘हॉटेल पॉलिटिक्स’

मुंबई । Mumbai

- Advertisement -

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) राज्यात महाविकास आघाडीने (MVA) महायुतीला (Mahayuti) धोबी पछाड दिला आहे. राज्यातील मोठा पराभव महायुतीच्या चांगलाच जिव्हारी लागली आहे. दरम्यान राज्यातील लोकसभा निकालानंतर आता सर्व पक्षांचे लक्ष लागून आहे, ते म्हणजे विधानपरिषद निवडणुकीकडे (MLC Election). यामध्ये महायुती की महाविकास आघाडी, कोण मारणार बाजी? कोण कुणाला धडा शिकवणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

येत्या शुक्रवारी (१२ जुलै) विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी मतदान पार पडणार आहे. विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे (BJP) पाच, शिवसेना शिंदे गट (Shivsena Shinde Group) आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (NCP Ajit Pawar) प्रत्येकी दोन तर, काँग्रेस (Congress), शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (SHivsena UBT) पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचा (Shetkari Kamgar Paksha) प्रत्येकी एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे.

महायुतीत भाजपकडून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यासह योगेश टिळेकर (Yogesh Tilekar), परिणय फुके (Parinay Fhuke), अमित गोरखे (Amit Gorkhe), सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांना तर, शिंदे गटाकडून भावना गवळी (Bhavana Gavali), कृपाल तुमाने (Krupal Tumane) यांना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर (Rajesh Vitekar), शिवाजीराव गर्जे (Shivajirao Garje) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय, महाविकास आघाडीकडून डॉ. प्रज्ञा सातव (काँग्रेस) (Pradnya Satav), मिलिंद नार्वेकर (ठाकरे गट) (Milind Narwekar), शेकापचे जयंत पाटील (jayant Patil) निवडणूक रिंगणात आहेत. जयंत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पाठिंबा दिला आहे.

नक्की वाचा – अंबानींच्या संगीत कार्यक्रमात तेजस ठाकरेंचा डान्स, विरोधकांकडून झाले टीकेचे धनी

लोकसभा निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून सर्व ५ उमेदवार निवडून आणण्याचे जोरदार प्रयत्न चालू असून दुसरीकडे शिंदे गट, अजित पवार गट यांच्याकडूनही मतांची आकडेमोड केली जात आहे. विरोधी पक्षांमध्ये काँग्रेस, उद्धव ठाकरे गट व शरद पवार गट यांच्याकडूनही आपापल्या उमेदवारांसाठी समीकरणं जुळवली जात असताना नेमका एक पराभूत होणारा उमेदवार कुणाचा असेल? याची चुरस निर्माण झाली आहे.

या निवडणुकीसाठी मतदान गुप्त स्वरुपाचे असल्याने मोठ्या प्रमाणात घोडेबाजाराची शक्यता नाकारता येत नाही. क्रॉस व्होटिंगची शक्यतादेखील आहे. त्यामुळे कोणाची मते फुटणार याकडे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर आलेली असल्याने विधानपरिषदेच्या निवडणुकीतील पराभवामुळे मतदारांत चुकीचा ‘मेसेज’ जाऊ नये याची दक्षता सत्ताधारी व विरोधक घेत आहेत. या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागल्यास येत्या काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत बॅकफूटवर जावे लागणार आहे.

दरम्यान क्रॉस व्होटिंगच्या (Cross Voting) भीतीमुळे हॉटेल पॉलिटिक्सला (Hotel Politics) वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आमदार हॉटेल ताज लँड्स एन्डमध्ये थांबणार आहेत, तर भाजपचे आमदार हॉटेल ताज प्रेसिडेन्सीमध्ये थांबतील. ठाकरे गटाचे आमदार परेलच्या आयटीसी हॉटेलमधील थांबतील. एकनाथ शिंदे यांनी ६० रूम्स बुक केल्याची माहिती आहे. मुंबईतील महत्त्वाच्या हॉटेल्सच्या सर्व रुम्स बुक झाल्या असल्याने अजित पवार गटाला अद्याप हॉटेल सापडले नाही. त्यांच्याकडून हॉटेल्सचा शोध सुरू आहे.

नक्की वाचा – भाजप आमदाराचे राहुल गांधींबाबत वादग्रस्त विधान; म्हणाले, “त्यांना संसदेत कोंडून…

मतदान कसं होणार?

विधानपरिषदेच्या निवडणुकीत उमेदवारांसाठी विधानसभेचे आमदार मतदान देत असतात. हे मतदान गुप्त पद्धतीने होत असलं तरी पहिल्या आणि दुसऱ्या प्रेफरंसच्या मतांनुसार उमेदवार निवडून येत असतो. विधानसभेत आताच्या घडीला आमदारांचं संख्याबळ २७४ आहे. यानुसार प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी पहिल्या प्रेफरन्समध्ये २३ मतांची म्हणजे २३ आमदारांच्या मतांची आवश्यकता आहे.

संबंधित मतदारसंघाची मतदारसंख्या आणि उमेदवार यांच्यानुसार निवडणूक आयोग एक कोटा निश्चित करतं. निर्धारित कोट्याएवढी प्रथम क्रमांकांची मतं मिळवणारा उमेदवार विजयी होतो. पहिल्या पसंतीची मतं कोट्याएवढी नसल्यास दुसऱ्या पसंतीची मतं जो पूर्ण करील तो उमेदवार विजयी होईल. निर्धारित कोटा पूर्ण करणारा कोणत्याही पसंतीचा उमेदवार विजयी होऊ शकतो. यात कोणाचेही मतदान वाया जात नाही. विधानपरिषद निवडणुकीत सर्वांत मोठा मुद्दा गुप्त मतदानाचा आहे. राज्यसभेत खुलं मतदान असल्याने पक्षाच्या आमदारांना मत दाखवून टाकावं लागतं. पण विधान परिषदेत आमदार गुप्त मतदान करतात. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता नेहमी व्यक्त केली जाते.

नक्की वाचा – विधानसभा निवडणुकीआधी राज्यात तिसरी आघाडी?

महायुतीमध्ये भाजपा १०३, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४०, शिवसेना ३७ आणि अपक्ष १७ असे एकूण १९७ आमदार आहेत. त्यांचे ९ उमेदवार असल्याने त्यांना आणखी १० मतांची गरज आहे. दुसरीकडे, काँग्रेसचे ३७ , उद्धव ठाकरे गटाचे १५ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे १३ असे एकूण ६५ आमदार आहेत. क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे शंकरराव गडाख यांनी ठाकरे गटाला समर्थन दिले आहे. त्यामुळे आघाडीचे संख्याबळ ६६ झाले आहे.

आघाडीला आपले तीनही उमेदवार निवडून आणण्यासाठी ६९ मतांची गरज असल्याने आणखी तीन मते हवी आहेत. क्रॉस व्होटिंगच्या भीतीने काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना जादा मते दिली तर, महाविकास आघाडीला आणखी मतांची गरज भासू शकते. ही परिस्थिती पाहता उर्वरित मतांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न महायुती आणि महाविकास आघाडीकडून सुरू आहे. त्यात बहुजन विकास आघाडीचे ३, प्रहार संघटनेचे २, एमआयएम २, समाजवादी पार्टी २, मनसे १, माकपा १ अशी एकूण ११ मते आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या