Sunday, June 2, 2024
Homeधुळेचिंताजनक, जिल्ह्यात एकाच दिवशी 22 कोरोनाचे रुग्ण

चिंताजनक, जिल्ह्यात एकाच दिवशी 22 कोरोनाचे रुग्ण

धुळे ।Dhule। प्रतिनिधी

जिल्ह्यात एकाच दिवशी (same day) 22 कोरोनाचे रुग्ण (22 corona patients) आढळून (found) आले आहेत. यामुळे प्रशासनाची चिंता (Administration concerns) वाढली आहे.

- Advertisement -

जिल्हा रुग्णालय येथील सात अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात सोनगीर पोलीस ठाण्यात एक, नवजीवननगरात एक, साक्रीरोड एक, चाळीसगाव रोड एक, प्रोफेसर कॉलनी एक, धुळ्यातील इतर दोन रुग्णांचा समावेश आहे.

शिंदखेडा तालुक्यातील रॅपीड अ‍ॅन्टीजन टेस्टचे सहा अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात कामपूर दोन, जोगशेलू एक, चौगाव बुद्रूक एक, विखरण एक, विखरण आश्रम शाळा एक रुग्णांचा समावेश आहे.

महापालिका सीसीसीमधील सहा अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात लक्ष्मीनगर एक, तुळशिराम नगर एक, सुभाषनगर दोन, मनमाड जीन एक, पोलीस प्रशिक्षण केंद्र एक या रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 51 हजार 175 रुग्ण आढळून आले आहेत. तर 676 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात महापालिका क्षेत्रात 264 तर ग्रामीण भागात 412 रुग्णांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या