Saturday, May 18, 2024
Homeक्रीडाWPL-2023 : MI vs DC - मुंबई इंडियन्स चॅम्पियन

WPL-2023 : MI vs DC – मुंबई इंडियन्स चॅम्पियन

मुंबई। वृत्तसंंस्था Mumbai

महिला प्रीमियर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या मोसमाचा शेवट आज मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर मुंबई इंडियन्स- दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांमध्ये अजिंक्यपदाची लढत रंगली. हरनप्रीत कौरच्या मुंबई इंडियन्सने पहिल्या हंगामाचे विजेतेपद पटकावत आश्चर्यकारक कामगिरी केली. अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा सात गडी राखून पराभव केला.

- Advertisement -

मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीने 20 षटकांत नऊ गडी गमावून 131 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईने 19.3 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात 134 धावा करून सामना जिंकला. इंग्लंडची अनुभवी खेळाडू नताली सीव्हर ब्रंटने महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्रात मुंबई इंडियन्सला चॅम्पियन बनवले आहे. त्याने 55 चेंडूत नाबाद 60 धावा करून विजेतेपद पटकावले.

नतालीने अमेलिया केरसोबत चौथ्या विकेटसाठी 20 चेंडूत नाबाद 39 धावांची भागीदारी केली. अमेलिया केर आठ चेंडूत 14 धावा करून नाबाद राहिली. नतालीने याआधी कर्णधार हरमनप्रीत कौरसोबत तिसर्‍या विकेटसाठी 74 चेंडूत 72 धावांची भागीदारी केली होती. हरमनप्रीत 39 चेंडूत 37 धावा करून बाद झाली. हिली मॅथ्यूजने 13 आणि यास्तिका भाटियाने चार धावा केल्या. दिल्लीकडून राधा यादव आणि जेस जोनासेन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

- Advertisment -

ताज्या बातम्या