Sunday, November 24, 2024
Homeब्रेकिंग न्यूजविधानसभा निवडणुकीच्या निकालावर यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया- पुगोगामी महाराष्ट्रासाठी…

विधानसभा निवडणुकीच्या निकालावर यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया- पुगोगामी महाराष्ट्रासाठी…

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

विधानसभा निवडणुकीत लागलेले निकाल अत्यंत आश्चर्यजनक आणि अनपेक्षित आहेत. हे निकाल शाहू फुले आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्राला अजिबात अपेक्षित नाहीत. विरोधी पक्षाला पूर्णपणे दाबून टाकण्याचा हा प्रयत्न आहे. पुरोगामी महाराष्ट्रात काय खेळी चालली आहे हे समजण्याच्या पलिकडे आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा – Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या निकालावर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया – निकाल पटला नाही तरी…

विधानसभा निवडणुकीत यशोमती ठाकूर यांचा पराभव झाला. पण त्यांनी समाज माध्यमातून मतदारांचे आभार मानले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रात लागलेल्या निकालाबद्दल आश्चर्य व्यक्त केले.

हे देखील वाचाMaharashtra Assembly Election 2024 : देवळाली मतदारसंघातून सरोज अहिरे विजयी; सिद्ध पिंपरीत जंगी स्वागत

ज्या मतदारांनी महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत मतदान केले त्यांचे आभार. पण निकाल आश्चर्यजनक आहेत. हे निकाल अपेक्षित नाहीत. आपला महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. या पुरोगामी महाराष्ट्रात काय खेळी केलेली आहे. हे समजण्याच्या पलिकडे आहे. पण नक्कीच काही तरी झालेले आहे. विरोधी पक्ष पूर्णपणे दाबून टाकण्याचा प्रयत्न झाला आणि हे लोकशाहीच्या विरोधात आहे असे माझे वैयक्तीक मत आहे, असे ठाकूर यांनी म्हटले आहे.

हे देखील वाचाMaharashtra Assembly Election 2024 : नांदगाव मतदार संघात सुहास कांदे विजयी; शिवसैनिकांचा जल्लोष

ज्या प्रकारे देश चालला आहे. त्या सर्व गोष्टी आपण आवर्जुन बारीकपणे बघितल्या पाहिजेत आणि त्यावर काय पावले उचलायची ती उचलली पाहिजे. शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र अशा प्रकारचा निकाल देऊ शकत नाही याच्यावर माझा विश्वास आहे. पराभूत झाले असतो तरी हा काही शेवट नाही.

हे देखील वाचा – Maharashtra Assembly Election 2024 : मालेगाव बाह्यमध्ये दादा भुसे यांचा विक्रमी विजय; महायुतीचा अभुतपुर्व जल्लोष

आमची लढाई लोकशाही वाचवण्याची आहे आणि ती लढाई सुरु राहिल. विरोधी पक्ष म्हणून आम्ही ते करणारच आहोत. तुमचे पाठबळ आमच्या पाठिशी राहावे अशी अपेक्षा आहे. लोकशाहीत जर कोणी काही गडबड करू इच्छित असेल तर आपण त्याच्याकडे कटाक्षाने पाहिले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या