Monday, May 6, 2024
Homeनगरयात्रेत वाद घातला म्हणून एकास मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

यात्रेत वाद घातला म्हणून एकास मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

तू आणि तुझ्या मित्रांनी आमच्या बरोबर यात्रेत वाद का घातला? असे म्हणून सलमान पठाण याला लाथाबुक्क्यांनी व फायटरने मारहाण करून जखमी केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना 10 एप्रिल रोजी राहुरी शहरात घडली.

- Advertisement -

सलमान सलीम पठाण (वय 24) रा. राजवाडा, राहुरी बुद्रुक हा तरूण सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास शहरातील भागीरथीबाई शाळा रोड परिसरातील चहाचे टपरीचे समोर चहा पित होता. तेथे आरोपी आले आणि सलमान पठाण याला म्हणाले की, काल तू व तुझे मित्र हर्षद उत्तम साळवे, विशाल उत्तम साळवे अशांनी आमचेसोबत राहुरी येथील खंडोबाच्या यात्रेमध्ये वाद का केला होता? असे म्हणून शिवीगाळ करत सलमान पठाण याला तिघा जणांनी लाथाबुक्क्याने व लोखंडी फायटरने मारहाण करून जखमी केले. तू पुन्हा आमचे नादी लागला तर तुझे हातपाय तोडू, अशी धमकी दिली.

घटनेनंतर सलमान सलीम पठाण याने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्याच्या फिर्यादीवरून आरोपी योगेश पिसाळ, प्रशांत तमनर, दोघे रा. गोटुंबे आखाडा, ओंकार साळवे रा. मुलनमाथा ता. राहुरी. या तिघांवर गुन्हा रजि. नं. 363/2023 भादंवि कलम 323, 324, 504, 506, 34 प्रमाणे मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या