Friday, May 3, 2024
HomeUncategorizedमराठवाडा व विदर्भाला 'यलो अलर्ट'

मराठवाडा व विदर्भाला ‘यलो अलर्ट’

औरंगाबाद – aurangabad

वर्षअखेरचा आठवडा थंडीचा नव्हे तर मुसळधार (Heavy rain) पावसाचा ठरणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. 28 आणि 29 डिसेंबरला मराठवाड्यासह (Marathwada) विदर्भासाठी (Yellow alert) यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

- Advertisement -

हवामान विभागाकडून मराठवाडा आणि विदर्भात 28 आणि 29 डिसेंबरला पावसाची शक्यता असल्याचं भाकित करण्यात आलं आहे. त्यानुसार हवामान विभागानं मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जालना, परभणी, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, औरंगाबाद, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, अमरावती या जिल्ह्यांत 29 डिसेंबर रोजी पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसंच, या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे.

राज्यात थंडीचा कडाडा वाढला असतानाच वर्षाअखेर राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ऐन हिवाळ्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने पुन्हा एकदा बळीराज्याची चिंता वाढली आहे. पुढील दोन दिवसात 28 आणि 29 डिसेंबर रोजी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

अधिकाऱ्याचे ट्विट

26 डिसेंबरपासून वायव्य भारतावर व 27 डिसेंबरपासून मध्य भारतावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा (WD) प्रभाव पडण्याची दाट शक्यता. राज्यात खाली दर्शविल्या प्रमाणे 28-29 डिसेंबरला काही जिल्यांत गडगडाटासह पावसाची शक्यता व काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता.

-IMD

- Advertisment -

ताज्या बातम्या