Thursday, May 2, 2024
Homeजळगावमहिलेचा विनयभंग केल्यानंतर तरुणाचे विष प्राशन

महिलेचा विनयभंग केल्यानंतर तरुणाचे विष प्राशन

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

पती घराबाहेर (Husband outside the house) गेल्याची संधी साधत योगेश बद्री राठोड (रा. सुभाषवाडी) या तरुणाने (youth) महिलेच्या (woman) घरात घुसून तीचा विनयभंग (molestation) केला. महिलेने आरडाओरड केल्यानंतर योगेश हा महिलेच्या पतीचा मोबाईल (Mobile) घेवून पळून गेला. दरम्यान, आता आपण पकडले जावू (We will be caught) या भितीपोटी योगेशने विष (poison) प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न (Suicide attempt) केला. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून याप्रकरणी त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावात 22 वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. शुक्रवारी रात्री या महिलेने रात्री 9 वाजेच्या सुमारास आपल्या कुटुंबियांसोबत जेवण केले. त्यानंतर दहा वाजता त्यांचे पती हे शौचास जाण्यासाठी घरातून निघाले.

महिलेचा पती घरात नसल्याची संधी साधत योगेश याने त्या महिलेच्या घरात प्रवेश केला. ही महिला आपल्या मुलांसह झोपलेली असतांना योगेशने तिच्यासोबत अश्लिल वर्तन केले. त्यानंतर तिचे तोंड दाबून मुलीसह तिला मारण्याची धमकी देखील दिली.या प्रकरामुळे ती महिला प्रचंड घाबरलेली होती. त्या महिलेने योगेशला लांब ढकलण्याचा प्रयत्न केला असता, त्याने महिलेच्या गालावर चापट मारली..

संशयिताला धक्का देत काढला घरातून पळ

संशयिताकडून महिलेला मारहाण झाल्याने संतप्त झालेल्या महिलेने योगेशला जोरात लाथ मारुन त्याला दूर केले. त्यानंतर घरातून बाहेर पडली. परंतु योगेशने त्या महिलेला जोरात धक्का देवून तीला जमीनीवर पाडले.

कार्तिकी पौर्णिमानिमीत्‍त केरळी महीला ट्रस्टचे कार्तिक स्वामी मंदीर दुपारनंतर दर्शनासाठी खुले

विष प्राशन करीत केला आत्महत्योचा प्रयत्न

पीडित महिलेचा पती संशयित योगेशला ओळखत असल्याने त्याची लागलीच ओळख पटली. दुसर्‍या दिवशी महिलेच्या पतीने त्याचा शोध घेतला मात्र भीतीपोटी योगेश राठोड याने विष प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु त्याच्या कुटूंबियाने त्याला लागलीच शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

महिलेच्या फिर्यादीवरुन योगेश राठोड याच्याविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे व रतिलाल पवार गुन्ह्याचा तपास करीत आहेत

PHOTOS # जखम डोक्याला, मलमपट्टी पायाला..!

महिलेच्या पतीचा मोबाईल घेवून संशयिताचे पलायन

महिला घरातून पडल्यानंतर आता आपण पकडले यावू या भीतीने योगेश याने घरातून पळ काढला. जाताना त्याने महिलेच्या पतीचाही मोबाईल देखील सोबत घेतला. योगेश बाहेर पळत असतानाच तिकडून महिलेचा पती घरी आला. त्याने आपल्या पत्नीला काय झाले म्हणून त्यांनी विचारणा केली असता महिलेने तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराची संपुर्ण आपबिती पतीसमोर कथन केली.

फैजपूरला होणार भव्यदिव्य “समरसता महाकुंभ”

- Advertisment -

ताज्या बातम्या