Wednesday, February 4, 2026
HomeनगरCrime News : तरूणीवर अत्याचार करून गर्भपात

Crime News : तरूणीवर अत्याचार करून गर्भपात

प्रेमसंबंधाचे नाटक || चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

प्रेमसंबंधाचे नाटक करून पीडित महिलेवर बळजबरीने वारंवार अत्याचार केल्याचा आणि त्यानंतर जातीवरून हिणवून लग्नास नकार देत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका तरुणासह चौघांवर अहिल्यानगरच्या कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला, श्रीगोंदा येथील रहिवासी आहे. संकेत हिरालाल पाटील (रा. धुळे) या तरुणाने पीडितेशी भावनिक नाते जोडून वेळोवेळी प्रेमाचे नाटक केले. लग्नाचे खोटे आश्वासन देत तिच्या संमतीशिवाय वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

- Advertisement -

यामुळे पीडिता गर्भवती झाली असता, आरोपीने तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. यानंतर आरोपीने पीडितेला तू खालच्या जातीची आहेस, मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही, असे म्हणून तिच्याशी लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. तसेच, पीडितेला उड्डाणपुलावरून खाली ढकलून जीवे मारण्याची धमकीही दिली. याशिवाय, हिरालाल पाटील (पूर्ण नाव माहिती नाही रा. धुळे), प्रसाद भिवसेने (पूर्ण नाव माहिती नाही रा. पिंपळगाव पिसा ता. श्रीगोंदा) आणि संदेश वंजारी (पूर्ण नाव माहिती नाही रा. निंबवी, ता. श्रीगोंदा) या संशयित आरोपींनी पीडितेला संकेत पाटील याच्यावर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी शिवीगाळ करत धमकावले आणि तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

YouTube video player

पीडितेच्या तक्रारीवरून, कॅम्प पोलीस स्टेशन येथे आरोपी संकेत पाटील आणि इतर तिघांवर अत्याचार, अ‍ॅट्रॉसिटी आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे करत आहेत.

ताज्या बातम्या

Rahata : लोणीचे हवालदार साळवी निलंबित; काय आहे कारण?

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata राहाता तालुक्यातील ममदापूर येथे सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणे आणि आरोपींशी आर्थिक हितसंबंध जोपासल्याचा ठपका ठेवत, लोणी पोलीस...