Thursday, January 8, 2026
Homeक्राईमसावेडीतील कॅफेत युवतीवर अत्याचार

सावेडीतील कॅफेत युवतीवर अत्याचार

पीडितेसह तिच्या भावाला मारून टाकण्याची धमकी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सावेडी (Savedi) उपनगरातील कॅफेमध्ये एका युवतीवर तरूणाने अत्याचार (Young Woman Abuse) केल्याची घटना समोर आली आहे. नगर शहरात राहणार्‍या पीडित युवतीने या प्रकरणी बुधवारी (28 ऑगस्ट) सायंकाळी दिलेल्या फिर्यादीवरून तरूणाविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

शोएब मोसीन शेख (रा. पंचपीर चावडी, अंबिका पतसंस्थेच्या समोर, माळीवाडा) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. फिर्यादी नगरमधील कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना तिची शोएब सोबत ओळख झाली होती. पुढे त्यांच्यात मैत्री झाल्यानंतर शोएबने तिला प्रेम असल्याचे बोलून दाखवले. फिर्यादीने त्याला होकार दिला. दरम्यान, जानेवारी- फेब्रुवारी 2024 मध्ये (नक्की तारीख नाही) शोएबने फिर्यादीला सावेडीतील एका कॅफेत बोलून घेतले. तेथील कॅबिनमध्ये त्याने तिच्यावर अत्याचार केला. सदरचा प्रकार झाल्याने फिर्यादी रडू लागली तेव्हा शोएब फिर्यादीला म्हणाला, ‘तू सदर झालेला प्रकार कोणाला सांगितला तर मी तुला व तुझ्या भावाला मारून टाकीन’ अशी धमकी (Threat) दिली.

YouTube video player

फिर्यादी घाबरल्याने त्यांनी कोणाला काही सांगितले नाही. त्यानंतरही शोएब फिर्यादीला फोन करून भेटण्यासाठी बोलवत होता. मात्र फिर्यादीने त्याचे फोन घेणे बंद केल्याने बुधवारी (28 ऑगस्ट) तो फिर्यादी काम करत असलेल्या ठिकाणी गेला. ‘मला तुझ्याशी बोलायचे आहे, तू मला भेटत नाही व माझा फोन पण घेत नाही, तू जर माझ्याशी बोलली नाही व भेटली नाही तर तुला व तुझे भावाला मारून टाकीन’ अशी धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी यांनी तोफखाना पोलीस ठाणे (Topkhana Police Station) गाठून फिर्याद दिली. पोलीस अधिक तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Crime : पैशांवरून बालमित्रांत वैर; वसुलीसाठी थेट जाळपोळ

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बालपणापासूनची घट्ट मैत्री, वर्षानुवर्षांचा विश्वास आणि त्यातून झालेले कोट्यवधींचे आर्थिक व्यवहार अखेर गंभीर वैरात बदलून थेट जाळपोळीपर्यंत पोहोचल्याची खळबळजनक घटना...