देवळाली कॅम्प | वाताॅहर Deolali Camp
पुणे हडपसर येथील हाॅस्पिटल मध्ये परिचारिकेचे काम करत असलेल्या शितल बाजीराव उखाडे वय 21 या युवतीचा इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन तोल जाऊन खाली पडल्याने मृत्यू झाला. या घटनेने शिलापुर गावावर शोककळा पसरली आहे.
नाशिक तालुक्यातील शिलापुर गावातील शिलत उखाडे हिने आपले नर्सिंगचे शिक्षण पुर्ण करुन पुणे येथील हडपसर (म्हेळुस्के) येथे साई हाॅस्पिटल मध्ये परिचारिका म्हणून काम करत होत्या. शुक्रवार दि २२रोजी सायंकाळी सुट्टी झाल्यावर शितलने आपल्या आईशी फोनवर बोलणे झाले त्यानंतर काही वेळातच पुन्हा फोन आला की शितलाचा तोल जाऊन ती खाली पडली असून तिच्या डोक्याला व छातीला जबर मार लागुन रक्तस्त्राव झाल्याने उपचार दरम्यान मृत्यू झाला.
शितल हिचे वडील हे एका हाॅस्पीटल मध्ये सुरक्षारक्षकाचेचे काम असुन आई शेतमजूरीचे काम करते. त्यांच्या घरची परिस्थिती बेताची असुन ही मुलीचे परिचारिकेचे शिक्षण पुर्ण करुन स्वताच्या पायावर उभे केले होते. या प्रकरणी पुणे पोलिस स्टेशनमध्ये आकास्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे.




