Saturday, May 18, 2024
Homeजळगावगावठी पिस्तूल, जीवंत काडतूसासह तरुणाला अटक

गावठी पिस्तूल, जीवंत काडतूसासह तरुणाला अटक

जळगाव – Jalgaon

शहरातील मेहरूण तलाव परिसरात दोन जिवंत काडतूसासह गावठी पिस्तूल घेवून फिरणार्‍या योगेश अंबादास बारी (वय ३१ रा. बारीवाडा, पिंप्राळा) या तरुणाला एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली आहे. त्याच्याकडून पिस्तूल व जीवंत काडतुस असा १६ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

शहरातील मेहरूण तलाव परिसरात कृष्णा लॉनच्या पाठीमागील बाजूस एक तरुण गावठी पिस्तूल व दोन जीवंत काडतुस सोबत घेवून फिरत असल्याची गोपनीय माहिती शुक्रवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल छगन तायडे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस नाईक इम्रान सय्यद, योगेश बारी, मुदस्सर काझी, किशोर पाटील, मुकेश पाटील, सचिन पाटील, साईनाथ मुंढे यांच्या पथकाने सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास मेहरुण तलाव परिसरात गावठी पिस्तूल घेवून फिरणार्‍या योगेश बारी या तरुणास ताब्यात घेतले.

गावठी पिस्तूलाबाबत त्याच्याकडे कुठलाही परवाना नसल्याने बेकायदेशीररित्या पिस्तूल तसेच जीवंत काडतुस बाळगल्याप्रकरणी योगेश बारी यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या