Thursday, March 27, 2025
Homeनगरइमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू

इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सावेडी उपनगरातील रासनेनगरमध्ये घडली. अजय संजय नायर (वय 25 रा. सिध्दार्थनगर, सावेडी) असे मयत तरुणाचे नाव आहे. रासनेनगर चौक येथे नौकासा इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्या बांधकामावर अजय नायर तिसर्‍या मजल्यावर काम करत होता. तेथून पडून तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी सविता वसंत घाडगे यांनी खासगी रुग्णालयात दाखल केले होते.

- Advertisement -

तेथे त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मंगळवारी (25 जून) 11:56 वाजता मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तशी माहिती त्यांनी तोफखाना पोलिसांना दिली. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास महिला पोलीस अंमलदार प्रियंका राऊत करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Accident News : दुचाकी व आयशर टेम्पोची समोरासमोर धडक

0
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi मोहटे (Mohote) गावात दुचाकी व आयशर टेम्पोची समोरा समोर धडक (Bike and Tempo Accident) होऊन यात दुचाकीस्वार जागीच ठार (Death) झाला...