Wednesday, April 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूजकादवा नदीपात्रात उडी घेऊन युवकाची आत्महत्या

कादवा नदीपात्रात उडी घेऊन युवकाची आत्महत्या

अवनखेड । वार्ताहर

- Advertisement -

दिंडोरी तालुक्यातील अवनखेड येथील कादवा नदीपात्रात एका युवकाने उडी घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

अभोणा येथील योगेश जगन्नाथ सूर्यवंशी (35) हा मागील काही वर्षापासून मानसिक आजारी होता. काल (गुरुवारी) त्याची पत्नी व चुलत भाऊ मयूर सूर्यवंशी असे दोघे त्याला अभोणा येथून नाशिक येथे खाजगी वाहनाने उपचारासाठी घेऊन जात असताना दुपारी 12.15 वाजेच्या सुमारास अवनखेड शिवारात कादवा नदीच्या पुलावर वाहन आले. त्याने मला नदीत पैसे व्हायचे आहेत असे सांगून वाहन उभे करण्यास सांगितले व वाहनाचा दरवाजा उघडून वाहनातून उतरून पळत जाऊन कादवा नदीच्या पुलावरून नदीपात्रात उडी मारली. तो पाण्यात बुडाला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ शेख, पोलीस हवालदार कमलेश देशमुख, पोलीस हवालदार प्रदिप शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल अविनाश आहेर आदींनी घटनास्थळी दाखल होत स्थानिक पोहणार्‍या व्यक्तींच्या मदतीने त्याच्या प्रेताचा शोध घेतला. दुपारी 3 वाजेच्या त्याचे प्रेत पाण्यात मिळून आले. त्याच्या मृत्यूबाबत त्याचे चुलते प्रभाकर दामोदर सूर्यवंशी रा. अभोणा ता. कळवण यांनी दिंडोरी पोलीस ठाण्याला दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पुढील तपास पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ शेख. पोलीस हवालदार गोतरणे हे करीत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : धक्कादायक! एका नामांकित कंपनीत तरूणींचे लैंगिक शोषण,...

0
नाशिक | Nashik काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये (Nashk) भोंदूगिरीच्या नावाखाली अशोक खरातने (Ashok kharat) नावाच्या व्यक्तीने महिलांचे लैंगिक शोषण केल्याची घटना उघडकीस आली होती. त्यामुळे एकच...