नाशिक | Nashik
काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये (Nashk) भोंदूगिरीच्या नावाखाली अशोक खरातने (Ashok kharat) नावाच्या व्यक्तीने महिलांचे लैंगिक शोषण केल्याची घटना उघडकीस आली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाचे राज्य पातळीवर देखील तीव्र पडसाद उमटले होते. तसेच राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचे खरातसोबत फोटो व्हायरल झाल्यामुळे त्यान राज्य महिला आयोग आणि पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणाचा तपास एसआयटी करत असून,दररोज नवनवे खुलासे होत आहेत.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : भोंदू खरातला दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा कोर्टात हजर केले जाणार, आजच्या सुनावणीत काय घडलं?
खरात प्रकरणाची चौकशी सुरु असतानाच स्वतःला गोरगरीब महिलांचा उद्धारकर्ता म्हणवून घेणाऱ्या एका साप्ताहिक व यूट्यूब चॅनेलचा पत्रकार रवींद्र एरंडे याला महिलांचे लैंगिक शोषण करून त्याचे चित्रीकरण केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. या दोन्ही घटनांमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असताना आता पुन्हा एकदा एका नामांकित कंपनीत महिला कर्मचाऱ्यांना धमकावून त्यांचा विनयभंग, शारीरिक शोषण तसेच मानसिक छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे नाशकात नेमकं चाललंय तरी काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Case : भोंदू खरात महिलांना जाळ्यात कसा ओढायचा? SIT प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली धक्कादायक माहिती
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या आठ मुलींचा विनयभंग करून लैंगिक शोषण, मानसिक छळ आणि धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. यात एक महिला आणि एचआरसह पाच पुरुषांचा समावेश असून, संशयित पुरुषांना अटक केली गेली आहे. या सर्व संशयित आरोपींना आज नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना विनयभंगाच्या प्रकरणात दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : खरातच्या जाळ्यात मुंबईचे उद्योजक; कोट्यवधींच्या मनी लाँड्रिंगचा शिर्डीतून पर्दाफाश, तेरावा गुन्हा नोंद
दरम्यान, याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात धार्मिक भावना दुखावणे १,अत्याचार १, विनयभंग ४ आणि विनयभंग व धार्मिक भावना दुखावणे ३ असे एकूण नऊ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून यात २० ते २५ मुलींचा समावेश असण्याची शक्यता आहे. सदर प्रकरणाचे गांभीर्य ओळखून नाशिक पोलीस आयुक्तांनी संदीप मिटके यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : खरातच्या चौकशीचा फास आवळला; आयकर, धर्मादायची एन्ट्री





