नाशिक | प्रतिनिधी | Nashik
भोंदूगिरीच्या जोरावर हजारो कोटींचे साम्राज्य उभे करणाऱ्या अशोक खरात (Ashok Kharat) याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. या प्रकरणाचा तपास आता लैंगिक अत्याचार आणि फसवणुकीपुरता मध्यर्यादित राहिला नसून, त्याला आर्थिक गैरव्यवहाराचा पदर असल्याचे स्पष्ट झाले आहे. सक्त वसुली संचालनालयाने यापूर्वीच तपास हाती घेतला असताना, आता आयकर विभाग आणि धर्मादाय आयुक्त कार्यालय देखील खरातच्या मालमत्तांची (Assets) झाडाझडती घेण्याच्या तयारीत आहेत.
हे देखील वाचा : Ashok Kharat Case : भोंदू खरात महिलांना जाळ्यात कसा ओढायचा? SIT प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली धक्कादायक माहिती
विशेष तपास पथकाने (SIT) खरातच्या संबंधित तब्बल १०० मालमत्तांचे दस्तऐवज आणि शेकडो बँक खात्यांची माहिती ईडीला (ED) सुपूर्द केली आहे. नाशिक, शिर्डी, पुणे आणि मुंबई यांसारख्या शहरांतील या मालमत्तांची बाजारपेठीय किंमत हजारो कोटींच्या घरात असल्याचा प्राथमिक धर्मादाय संस्थांच्या अंदाज आहे. खरातने नावाखाली किंवा धार्मिक कार्याचा आडोसा घेऊन हा काळा पैसा पांढरा केला का? यादृष्टीने धर्मादाय आयुक्त कार्यालय स्वतंत्रपणे चौकशी करण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : तब्बल ११२ पतसंस्था ‘सहकार’च्या रडारवर! सिन्नर-कोपरगाव-शिर्डी पट्ट्यात चौकशी
दरम्यान, लैंगिक अत्याचार, फसवणूक, मनी लॉड्रिंग आणि आता करचोरी अशा चार आघाड्यांवर तपास सुरू असून ईडी आणि इतर केंद्रीय यंत्रणा एकमेकांच्या सहकार्याने तपास करत असल्याने खरातचा ताबा लवकरच ईडीला मिळण्याची शक्यता आहे. नाशिकसह शिर्डी आणि राहाता पोलीस ठाण्यांतूनही (Shirdi and Rahata Police Station) तपास केला जात आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : खरातच्या जाळ्यात मुंबईचे उद्योजक; कोट्यवधींच्या मनी लाँड्रिंगचा शिर्डीतून पर्दाफाश, तेरावा गुन्हा नोंद
आता चाळीस दिवस शिल्लक
भारतीय न्याय संहितेतील नवीन तरतुदींनुसार, गुन्हा दाखल झाल्यापासून ६० दिवसांच्या आत दोषारोपपत्र सादर करणे बंधनकारक आहे. खरातवर पहिला गुन्हा १७ मार्च रोजी दाखल झाला होता. त्यातील २० दिवस उलटले असून, एसआयटीकडे आता तपासासाठी अवघे ४० दिवस उरले आहेत. खरातवर एकूण १४ गुन्हे दाखल असून, प्रत्येक गुन्ह्याचा तपास स्वतंत्रपणे करून वेळेत दोषारोपपत्र सादर करण्याचे मोठे आव्हान आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : भोंदू खरातला दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा कोर्टात हजर केले जाणार, आजच्या सुनावणीत काय घडलं?





