Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रMaratha Reservation : ऐन दिवाळीत आणखी एका तरुणाने आरक्षणाच्या मागणीसाठी संपवलं जीवन

Maratha Reservation : ऐन दिवाळीत आणखी एका तरुणाने आरक्षणाच्या मागणीसाठी संपवलं जीवन

मुंबई | Mumbai

राज्यात मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation ) मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असून ठिकठिकाणी आंदोलने, साखळी उपोषण केले जात आहे. तर काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. त्यातच सरकारने (Government) दोन महिन्यांचा अवधी मागून घेतल्याने मराठा आरक्षणाचा लढा काही अंशी थंडावला आहे. मात्र, अद्याप मराठा तरुणांच्या मनात राज्य सरकारच्या उदासीन धोरणामुळे संतापाचे वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता पुन्हा एकदा नांदेडमधील (Nanded) एका तरुणाने (Youth) आरक्षणासाठी आपलं जीवन संपवल्याची घटना घडली आहे…

- Advertisement -

पाझर तलावाच्या जमिनीच्या भूसंपादनाने शेतकरी भूमिहीन

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दाजीबा रामदास कदम (वय २३) असे आत्महत्या (Suicide) केलेल्या तरुणाचे नाव असून तो नांदेड तालुक्यातील मरळक येथील रहिवासी आहे. नांदेड शहराच्या छत्रपती चौक परिसरात (Chhatrapati Chowk Area) झेंडा चौक येथे ११ नोव्हेंबरला त्याने विष घेतल्याने तो तेथेच बेशुद्ध पडला होता. त्यानंतर त्याला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्याचा आज (दि.१३ नोव्हेंबर) रोजी मृत्यू (Death) झाला.

Round The Wicket: इंग्लिश क्रिकेटची दैना

दरम्यान, या तरूणाच्या जवळ एक सुसाईड नोट सापडली असून सुसाईड नोटमध्ये समाजाला आरक्षण मिळत नसल्यामुळे मी आत्महत्या करत आहे, असे लिहिले आहे. त्यानंतर पोलिसांनी (Police) ही सुसाईड नोट जप्त केली आहे. तसेच आत्महत्या करणार हा तरूण मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झाला होता अशी माहिती समोर आली असून त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी केली असल्याचे बोलले जात आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

नाशिकच्या मेनरोडवरील इमारतीला आग

- Advertisment -

ताज्या बातम्या