Thursday, May 2, 2024
Homeनाशिकभाजप कार्यालयावर आंदोलन : युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना अटक

भाजप कार्यालयावर आंदोलन : युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना अटक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

केंद्रातील भाजप सरकारकडून (BJP Government) ईडीच्या (ED) माध्यमातून काँग्रेसचे (Congress) नेते खा. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर सूडबुद्धीने होत असलेल्या चौकशीच्या निषेधार्थ व केंद्र सरकारने (Central Government) जी अग्निपथ सैन्य भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे…

- Advertisement -

यामुळे सैन्यात भरती होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अन्यायाविरोधात नाशिक युवक काँग्रेसच्यावतीने (Nashik Youth Congress) भाजपा कार्यालय (BJP Office) येथे नियोजित आंदोलनाला (Agitation) जात असताना युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांना नेहरु गार्डन येथे अटक (Arrested) करण्यात आली.

प्रदेश युवक उपाध्यक्ष प्रशांत ओगले (Prashant Ogle), जिल्हाध्यक्ष स्वप्निल पाटील (Swapnil Patil) यांच्या नेतृत्वाखाली ‘बेधडक आंदोलन’ भाजपा कार्यालयावर करण्यात आले.

यावेळी प्रदेश सचिव राहुल दिवे, प्रदेश युवक सरचिटणीस गौरव पानगव्हाणे, सचिव अतिषा पैठणकर, जिल्हा पदाधिकारी धनंजय कोठुळे, ओंकार पवार, नितेश निकम, जावेद पठाण, सलमान काझी ,अकिल कादरी, विधानसभा अध्यक्ष देवेद्र देशपांडे, जयेश सोनवणे, इम्रान अन्सारी, आकाश घोलप, सचिन खडतले, संदीप भोये, सलमान अतार, सुदेश अण्णा मोरे, तन्वीर शेख, अकबर खान, एजाज सय्यद आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या