Wednesday, January 7, 2026
Homeनगरशेततळ्यात पडून तरुणाचा मृत्यू

शेततळ्यात पडून तरुणाचा मृत्यू

राहाता |वार्ताहर| Rahata

अस्तगाव (Astgav) रोडलगत असलेल्या गाडेकर यांच्या शेततळ्यामध्ये रवींद्र जेजुरकर हा तरुण घराजवळ असलेल्या शेततळ्याजवळ फिरत असताना त्याचा पाय घसरून शेततळ्यामध्ये पडल्याची घटना शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत रवींद्र जेजुरकर यांचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला आहे.

- Advertisement -

जेजुरकर याचा मृतदेह तळ्यातून बाहेर काढण्यासाठी शिर्डी नगरपालिका, राहाता नगरपालिका अग्निशमन दल, राहाता पोलीस स्टेशन यांच्या अथक प्रयत्नानंतर शेततळ्यातून सदर तरुणाचा मृतदेह (Youth Deadbody) बाहेर काढण्यात आला. शासकीय रुग्णालयात जेजुरकर याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.

YouTube video player

या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सोपानराव काकड यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे. तळ्यात पडलेल्या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी राहाता नगरपालिकेचे पाणीपुरवठा विभाग प्रमुख अशोक साठे, फायरमन विकी साळवे, अमोल बनसोड, ऋषिकेश सदाफळ व नागरिकांनी प्रयत्न केले.

ताज्या बातम्या

Ridhima Pathak : ‘देश आधी, लीग नंतर!’ भारतीय प्रेझेंटर रिद्धिमा पाठकची...

0
दिल्ली । Delhi भारत आणि बांगलादेश यांच्यातील राजनैतिक संबंध सध्या अत्यंत तणावपूर्ण वळणावर आहेत. राजकारण आणि क्रिकेट या दोन्ही क्षेत्रांत दोन्ही देशांमधील संघर्ष तीव्र होताना...