Saturday, May 18, 2024
Homeनंदुरबारसर्पदंशाची लस न दिल्याने खेतिया येथे तरुणाचा मृत्यू

सर्पदंशाची लस न दिल्याने खेतिया येथे तरुणाचा मृत्यू

खेतिया Khetia । वार्ताहर-

खेतिया येथील आरोग्य केंंद्रात (health center) सर्पदंशाची लस (snakebite vaccination) उपलब्ध असतांनादेखील दिली नसल्याने तरुणाचा (Youth) मृत्यू (dies) झाल्याची घटना घडली. याबाबत संतप्त नागरिकांनी संबंधीत वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांवर कारवाईची मागणी करत आंदोलन केले.

- Advertisement -

खेतिया येथील तरुण शेतकरी अनिल काशिनाथ पवार (मराठे) वय 38 वर्ष यांना शेतामध्ये काम करीत असताना विषारी सर्पांने दंश केला. त्यांना तात्काळ खेतिया येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करून त्यांना पानसेमल येथे पाठविण्यात आले. पानसेमल येथे उपचार केल्यानंतर त्यांना बाहेर बडवानी किंवा शहादा येथे उपचार घेण्यासाठी जाण्यास सांगितले. परंतु खेतिया येथे पोहचण्यापूर्वी अनिल पवार (मराठे) यांचा मृत्यू झाला.

उपचाराअभावी मृत्यू झाल्यामुळे संतप्त नागरीकांनी आक्रोश व्यक्त करीत प्राथमिक आरोग्य केंद्रात आक्रोश केला. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला सूचना दिली. सदर घटनेची माहिती कळताच एसडीएम अंशु जावला यांनी तहसीलदार राकेश सस्तिया, अतिरिक्त तहसीलदार हुकुमसिंग निंगवाल यांना निर्देश दिले. त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाले. यावेळी प्रशासनिक अधिकारी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र खेतिया येथे पाहणी केली असता त्याठिकाणी सर्पदंशाचे इंजेक्शन स्नेकबाईट उपलब्ध असतांनादेखील अनिल पवार (मराठे) यास इंजेक्शन लावण्यात आले नाही. त्यामुळे संतप्त नागरीकांनी अनिलवर झालेल्या अन्यायासाठी तहसीलदारांना निवेदन दिले.

प्राथमिक आरोग्य केंद्रातील निष्काळजीपणा करणार्‍यांवर कार्यवाही करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. तहसीलदार राकेश सस्तिया, अतिरिक्त तहसीलदार हुकुमसिंग निंगवाल यांनी दोषींवर तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी तहसीलदार यांनी प्रशासनिक अधिकार्‍यांशी चर्चा करून घटनेची माहिती प्रशासनाला देऊन त्यावर एक कमिटी गठीत केली.

अनिल पवार (मराठे) हा अत्यंत नाजूक परिस्थितीतून गरीब होतकरू तरुण होता. शेती करून निर्वाह करीत होता. परंतु त्याच्यावर काळाने क्रूर घात केला व सर्पदंशाने त्याचा मृत्यू झाला. तो बास्केटबॉल, क्रिकेट, कब्बडीचा उत्कृष्ट खेळाडू होता. परिवाराचा एकुलता एक असून अत्यंत जबाबदारीने कार्य करायचा. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, 1 मुलगी, 4 बहीण असा परिवार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या