Sunday, June 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजबिबट्याच्या हल्ल्यात युवक जखमी

बिबट्याच्या हल्ल्यात युवक जखमी

चिंचखेड | वार्ताहर Chinchkhed

दिंडोरी तालुयातील चिंचखेड येथे मंगळवारी पहाटेच्या सुमारास चिंचखेड गावातील वेताळ मंदिराजवळ राहणार्‍या एका युवकावर बिबट्याने हल्ला केल्याने युवक जखमी झाला आहे. त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

- Advertisement -

चिंचखेड येथील वेताळबाबा मंदिराजवळ राहत असलेल्या सोमनाथ राजू शिंदे या युवकावर बिबट्याने हल्ला करीत जखमी केले आहे. हा युवक घरासमोर असलेल्या पलंगावर झोपलेला होता. पहाटेच्या सुमारास बिबट्याने भर वस्तीत प्रवेश केला. युवक अंगावर पांघरून घेऊन झोपला असल्याने व त्याचे पाय उघडे असल्याने बिबट्याने युवकाच्या पायावर हल्ला केला व त्याला ओढून नेण्याचा प्रयत्न केला. परंतु युवकानी आरडाओरडा केल्याने त्याचे कुटुंबीय तत्काळ घराबाहेर आले. त्यामुळे बिबट्या पळून गेला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

या घटनेची माहिती वन्यजीव रक्षक देविदास सताळे यांनी वणी येथील वन विभागाला दिली. त्यानंतर वन विभागाचे ज्ञानेश्वर वाघ यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन पाहणी करून पंचनामा केला. बिबट्याच्या हल्ल्यात युवकाच्या तळपायाला गंभीर जखम झाली असून त्यास पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. युवकाचे घर गावातच वेताळ मंदिरात लगत आहे. भर वस्तीत बिबट्याने प्रवेश केल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

वन विभागाने चिंचखेड शिवारातील बिबट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य सुनील मातेरे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

ताज्या बातम्या

शेत रस्त्याच्या वादातून तरुणास मारहाण

0
मानूर | वार्ताहर Manur कळवण तालुयातील भादवण शिवारात शेतजमिनीच्या वहिवाट रस्ता वादातून एका तरुणासह त्याच्या वडिलांना मारहाण केली. यामुळे मारहाण झालेल्या युवकाने विष घेत आत्महत्या...