Tuesday, October 27, 2026
HomeनाशिकNashik Crime News : फाईल डाऊनलोड न करताही गंडा; ज्येष्ठ वकिलाची चार...

Nashik Crime News : फाईल डाऊनलोड न करताही गंडा; ज्येष्ठ वकिलाची चार लाखांची फसवणूक

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सायबर गुन्हेगारांनी (Cyber Criminal) आता फसवणुकीची नवी आणि चिंताजनक पद्धत अवलंबली आहे. पूर्वी व्हॉट्सअ‍ॅपवर आलेली एपीके (एपीके) फाइल क्लिक केल्यावर मोबाईलचा ताबा मिळवून नागरिकांची फसवणूक (Fraud) केली जात होती. मात्र, आता गुन्हेगारांनी एक पाऊल पुढे टाकत थेट फाइल पाठवून ती न उघडताच बँक खात्यातून पैसे लाटल्याचा प्रकार समोर आला आहे. या नव्या तंत्रज्ञानावराधारित सायबर चोरांच्या प्रतापामुळे नाशिकरोड परिसरातील एक ७० वर्षीय ज्येष्ठ वकिलास ३ लाख ८० हजारांच्या रक्कमेला मुकले आहेत. उपनगर पोलीस ठाण्यात (Upnagar Police Station) गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

​मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रदीप वासुदेव गोसावी (वय ७०, रा. पुजादिप प्रेस्टिज पार्क, जगताप मळा, नाशिकरोड) हे वकिली व्यवसाय करतात. २१ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकरा ते दुपारी दीड वाजेच्या दरम्यान त्यांच्या मोबाईलवर एका अज्ञात क्रमांकावरून व्हॉट्सअ‍ॅप कॉल आला. समोरील व्यक्तीने गोसावी यांचा पेन्शन पेमेंट ऑर्डर अर्थात पीपीओ नंबर आणि जन्म तारीख सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्याच मोबाईलवर (Mobile) एक एपीके फाइल पाठविली. विशेष म्हणजे, फिर्यादी गोसावी यांनी एपीके फाइल पाहिली आणि न उघताच (ड्रॉप बॉक्स किंवा चॅटमध्येच ठेवून) दुर्लक्ष केले.

असे असतानाही सायबर चोरांनी त्यांच्या इंडियन ओव्हरसीज बँक, देवळाली शाखा (नाशिकरोड) मधील खात्याचा ताबा मिळवत नेट बँकिंगद्वारे अ‍ॅमेझॉन पे- इंडिया प्रा. लि. या नावाच्या खात्यावर एकाच वेळी तीन लाख ८० हजार रुपयांची रक्कम परस्पर वळवून घेतली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेसह माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६(ड), ६६(स) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील बडे करत आहेत. नागरिकांनी अशा कोणत्याही अनामिक कॉल्सना आणि व्हॉट्सअ‍ॅपवरील संशयास्पद फाइल्सना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सायबर सुरक्षेसमोर आव्हान

​काही दिवसांपूर्वी मोबाईलमध्ये एपीके फाइल डाऊनलोड करून किंवा इन्स्टॉल केल्यावरच हॅकर लोकांच्या खात्यावर डल्ला मारत होते. परंतु, आता फाइल ओपन न करतादेखील मोबाईलमधील गोपनीय डेटा किंवा यूपीआय/बँकिंग यंत्रणेत छेडछाड करून पैसे काढले जात असल्याने सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. केवळ एका फोन कॉलवर गोपनीय माहिती देणे आणि फाइल मोबाईलवर येणे एवढ्या मात्रेवरून बँक खात्यावर झालेला हा दरोडा सायबर सुरक्षा यंत्रणेसमोर आव्हान उभा करत आहे.

ताज्या बातम्या

Nashik : सिंहस्थ महाकुंभाच्या स्मृती आता टपाल तिकिटांवर

0
नाशिक । जिमाका वृत्तसंस्था सिंहस्थ महाकुंभमेळा २०२७ च्या निमित्ताने नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या समृद्ध धार्मिक वारशाची ओळख देशभर पोहोचवण्यासाठी रामकुंड आणि कुशावर्त तीर्थ या दोन पवित्र...