Thursday, May 2, 2024
Homeनाशिकबिबट्याच्या हल्ल्यात युवक जखमी

बिबट्याच्या हल्ल्यात युवक जखमी

सिन्नर । वार्ताहर Sinnar

तालुक्यातील मेंढी येथील शिवारात पिकाला पाणी देण्यासाठी रस्त्याने जात पायी जात असताना तरुण शेतकर्‍यावर बिबट्याने हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना आज (दि.28) सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. त्यात तरुणाच्या डोक्याला, पाठीला आणि पोटाला खोल जखमा झाल्याने त्यास तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.

- Advertisement -

खडांगळी, सोमठाणे शिवारात मेंढी चौफुलीच्या पुढे गिते-कोकाटे वस्ती आहे. शेतकरी सोमनाथ गिते, शाम कोकाटे यांचे या भागात शेतमळे आहेत. कृष्णा सोमनाथ गिते (17) हा सकाळी शिवारात शेततळ्यात पाऊस चांगला झाला की नाही हे पाहण्यासाठी गेला. भीज पाऊस नसल्यास वीजपंप सुरु करुन पाणी पिकांना द्यावे लागणार असल्याने त्याच्या वडिलांनी त्यास शेताकडे जाण्यास सांगितले. त्यामुळे तो सोमठाणे-मेंढीच्या खोलवाटाने शेताकडे निघाला होता. पायी जात असताना खोलवाटात दडी मारुन बसलेल्या बिबट्याने पाठीमागून बिबट्यावर हल्ला चढवला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

यावेळी बिबट्याने तीक्ष्ण पंजाच्या साह्याने त्याच्या डोक्यावर वार केले. कानाच्या बाजूने चावा घेतला. मात्र, याचवेळी कृष्णाने समयसूचकता दाखवत उंच भागावर पळ काढला. बचावासाठी त्याने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे जवळच असलेले सुनील रुकारी, शाम कोकाटे यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांच्या मदतीसाठी धावले. शेतकरी येत असल्याचे व कृष्णाच्या आरडाओरडमुळे बिबट्याने तेथून धुम ठोकली. जखमी झालेल्या कृष्णास शेतकर्‍यांनी तात्काळ वडांगळी येथील दवाखान्यात दाखल केले. मात्र, बिबट्याने डोक्याला, पोटाला व पाठीवर खोल जखमा झाल्याने प्राथमिक उपचार करुन त्यास पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पाच वर्षांपूर्वी भावावर हल्ला

कृष्णावर ज्या ठिकाणी बिबट्याने हल्ला केला त्याच परिसरात पाच वर्षांपूर्वी कृष्णाचा चुलत भाऊ वैभव नवनाथ गिते याच्यावरही बिबट्याने हल्ला चढवत जखमी केले होते. आज पुन्हा यात भागात बिबट्याने कृष्णावर हल्ला करुन जखमी केल्याने परिसरातील शेतकर्‍यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरात रात्रीच्यावेळी बिबट्या दर्शन देत असल्याचे शेतकर्‍यांना घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. त्यात आता दिवसाढवळ्या बिबट्याने तरुणावर हल्ला चढवत जखमी केले आहे. त्यामुळे वनविभागाने या परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या