Thursday, March 13, 2025
Homeक्राईमCrime News : ‘त्या’ तरुणाचा गळा आवळून खून

Crime News : ‘त्या’ तरुणाचा गळा आवळून खून

शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट || चास शिवारात आढळला होता मृतदेह

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अहिल्यानगर- पुणे महामार्गावर चास (ता. नगर) शिवारात सोमवारी संशयास्पद परिस्थितीत तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. त्याचा गळा आवळून खून झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. सुरूवातीला नगर तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मंगळवारी अज्ञात व्यक्तीविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, त्या तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यामुळे त्याचे मारेकरी शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

- Advertisement -

चास शिवारात हॉटेल आदित्यनराजे समोर व हॉटेल श्री स्वामी समर्थच्या पाठीमागील भोयरे पठार गावाकडे जाणार्‍या कच्च्या रस्त्याच्या परिसरात एका तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती नगर तालुका पोलिसांना सोमवारी सकाळी मिळाली. माहिती मिळताच अहिल्यानगर ग्रामीणचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

डॉक्टरांचा शवविच्छेदन अहवाल मंगळवारी पोलिसांना प्राप्त झाला असून सदर तरुणाचा गळा आवळून खून झाला असल्याचे समोर आले आहे. सदर मृत तरुणाचे अंदाजे वय 25 वर्षे आहे. त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. जर कोणास या तरुणाबाबत काही माहिती असेल, तर त्यांनी तातडीने नगर तालुका पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ओळख पटलेली नाही
मयत तरूणाची ओळख पटलेली नाही. मात्र त्याचा गळा आवळून खून झालाचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले आहे. त्याची ओळख पटवून मारेकरी शोधण्याचे आव्हान नगर तालुका पोलिसांसमोर आहे. दरम्यान, खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तरुणाची ओळख पटवून त्याचे मारेकरी शोधण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत असल्याचे उपनिरीक्षक पतंगे यांनी सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...