Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमझेंडीगेटमधील कत्तलखान्यावर एलसीबीचे पुन्हा धाडसत्र

झेंडीगेटमधील कत्तलखान्यावर एलसीबीचे पुन्हा धाडसत्र

12 जणांविरूद्ध गुन्हा || पावणे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी (दि. 13) शहरातील झेंडीगेट परिसरात सुरू असलेल्या दोन कत्तलखान्यावर छापे घालून डांबून ठेवलेल्या गोवंशीय जनावरांची सुटका केली. तर, 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून गोमांसासह पाच लाख 71 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून सलग कारवाई सुरू आहे.
राज्यात बंदी असलेल्या गोमांस विक्री व वाहतूकसंदर्भात कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना दिल्या आहेत. त्यानुसार पोलीस अंमलदार संदीप पवार, अतुल लोटके, संदीप दरंदले, रवींद्र घुंगासे, शिवाजी ढाकणे, आकाश काळे, विशाल तनपुरे यांचे पथक नेमूण माहिती घेऊन कारवाईच्या आदेश केला.

- Advertisement -

पोलीस पथकाल शुक्रवारी (दि.13) आंबेडकर चौक, झेंडीगेट येथे वहाब कुरेशी, नासीर कुरेशी व सुफियान कुरेशी गोवंशी जातीचे जिवंत जनावराची कत्तल करून मांस विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने शुक्रवारी झेंडीगेट परिसरात छापा घालून मुस्तकीम वहाब कुरेशी (वय 22, रा.आंबेडकर चौक, झेंडीगेट) याला ताब्यात घेतले. त्याला कत्तलखान्याबाबत विचारले असता वहाब बाबुलाल कुरेशी (पसार), नासीर बाबुलाल कुरेशी (पसार), सुफियान कुरेशी (पसार) (सर्व रा.व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट) यांच्या मालकीचे असल्याचे सांगून जनावरांची कत्तल केल्याचे सांगितले. तेथून पोलिसांनी 81 हजाराचे 270 किलो गोमांस जप्त केले. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, पोलीस पथकाला बाबा बंगाली दर्ग्यापाठीमागे, झेंडीगेट अहिल्यानगर येथे अख्तर हुसेन कुरेशी (रा. बाबा बंगाली चौक, झेंडीगेट) हा त्याचे साथीदारासह गोवंशी जनावरांची कत्तल करीत असून, काही जिवंत जनावरे डांबून ठेवलेली आहेत, अशी माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने छापा घातला असता तिघे गोवंशीय जनावरांची कत्तल करताना आढळून आली. त्यांनी हासनेन सादिक कुरेशी (वय 23, रा. व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट), मुजक्कीर मुस्ताक कुरेशी (वय 34 रा.झेंडीगेट), निसार अहमद मुख्तार कुरेशी (वय 36, रा.आलमगीर, भिंगार ) अशी सांगितली. त्यांच्याकडून जनावरे, 300 किलो गोमांस, दुचाकी, सुरा असा 4 लाख 90 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

ताब्यातील संशयित आरोपीकडे जप्त मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता अख्तर हसन कुरेशी (पसार), माजिद सादिक कुरेशी (पसार), तौसीफ मुस्तका कुरेशी (पसार), शहेबाज मुस्तफा कुरेशी(पसार), मुज्जु मुस्तफा कुरेशी (पसार) (सर्व रा. व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट, नगर) यांचा असल्याचे सांगितले. वरील आठ जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेकडून वरील दोन्ही कारवाईमध्ये 12 संशयित आरोपींविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...