Thursday, May 2, 2024
Homeनाशिकजि. प. सेवक बदल्या; हालचालींना वेग

जि. प. सेवक बदल्या; हालचालींना वेग

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषद ( Zilla Parishad ) सेवकांच्या बदल्या ( Transfer ) होणार की नाही, याबाबत साशंकता असून प्रशासनाने मात्र सेवक बदल्यांबाबत हालचालीना सुरुवात केली आहे. सेवकांच्या बदल्याबाबत शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त झालेले नसले तरी, मे 2014 च्या शासन आदेशाप्रमाणे कार्यवाही सुरू केली आहे. बदली प्रक्रियेने आदिवासी व बिगर आदिवासी भागातील समतोल ढासळून बिगर आदिवासीतील रिक्त जागांचा भार वाढण्याची शक्यता असल्याने बदली प्रक्रियांबाबत प्रशासन फारसे उत्सुक नसल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने बदल्यांचे वेळापत्रक तयार केले आहे. हे वेळापत्रक मान्यतेसाठी प्रशासनाला सादर केले आहे. यावर काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे.

साधारण मे महिन्यात जिल्हा परिषद सेवकांची बदली प्रक्रिया पार पडत असते. मात्र, दोन वर्षे करोनाचे संकट असल्याने बदली प्रक्रिया होऊ शकलेली नाही. मागील वर्षी 15 टक्के विनंती बदल्या झाल्या होत्या. मात्र, नियमित बदली प्रक्रिया पार पडल्या नाहीत. यंदा करोनाचे संकट कमी झाल्याने बदली प्रक्रिया होणार,असे बोलले जात होते. त्यादृष्टीने प्रशासनाने सेवकांच्या सेवाजेष्ठता यादी तयार करण्याचे काम देखील महिनाभरापासून सुरू केलेले आहे.

सेवकांना बदल्यांची प्रतीक्षा असली तरी, प्रशासन बदल्यांबाबत संभ्रमात आहे. यातच सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवडयांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका जून अखेरपर्यंत होऊ शकतील, असा अंदाज वर्तविण्यात येत असल्याने आचारसहिंता लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आचारसहिंतेत बदली प्रक्रिया होऊ शकत नसल्याचे सांगितले जात आहे.

या सर्व बाबींमुळे बदली प्रक्रियासंदर्भात संभ्रम तयार झाला आहे. मात्र असे असले तरी, सामान्य प्रशासनाने नियमाप्रमाणे बदली प्रक्रियेची कार्यवाही सुरू केली आहे. त्यासाठी सेवक बदल्यांचे वेळापत्रक तयार करत मान्यतेसाठी सादर केले आहे. याबाबत प्रशासनाने अद्याप निर्णय घेतलेले नसल्याचे कळते. दुसरीकडे, बदल्यांबाबत हालचाली सुरू झाल्याने सेवक वर्गात समाधानाचे वातावरण आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या