Monday, February 9, 2026
Homeब्रेकिंग न्यूजZP Election Result 2026 : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये महायुतीच्या २७...

ZP Election Result 2026 : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये महायुतीच्या २७ जागा बिनविरोध; वाचा विजयी उमेदवारांची यादी

मुंबई | Mumbai

राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितीच्या निवडणुकीचा (Zilla Parishad and Panchyat Samiti Election) निकाल आज (सोमवार)जाहीर होत आहेत. यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्ह्यांतील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांचा समावेश आहे.

- Advertisement -

शनिवारी (दि. ०७) रोजी १२ जिल्हा परिषदेच्या ७३१ तर पंचायत समित्यांच्या १ हजार ४६२ जागांसाठी एकूण २५ हजार मतदान केंद्रांवर मतदान पार पडले होते. या निवडणुकीसाठी ७ हजार ४३८ उमेदवार रिंगणात होते. तर राज्यभरात एकूण ६६.२८ टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली होती. मात्र, हे निकाल जाहीर होण्याआधीच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये महायुतीच्या २७ जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या.

YouTube video player

हे देखील वाचा : ZP Election Result 2026 : राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ समित्यांसाठी मतमोजणीला सुरूवात

यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या ८, तर पंचायत समितीच्या १७ जागा महायुतीने (Mahayuti) बिनविरोध (Unopposed) जिंकल्या आहेत. ५० सदस्यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपचे ७ आणि शिंदे गटाचा १ सदस्य बिनविरोध निवडून आला होता. तर १०० सदस्यसंख्या असलेल्या पंचायत समितीमध्ये भाजपचे १६ आणि शिंदे शिवसेनेचा ०१ सदस्य बिनविरोध विजयी झाला आहे. तसेच रायगड आणि रत्नागिरीतून शिवसेनेचे (Shivsena) दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले.

महायुतीच्या बिनविरोध विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग (८ बिनविरोध)

१) खारेपाटण; प्राची इस्वालकर(भाजप)
२) बांदा; प्रमोद कामत (भाजप)
३) जाणवली; रुहिता राजेश तांबे ( भाजची कार्यकर्ती उमेदवार शिवसेना)
४) पडेल ;सुयोगी रविंद्र घाडी (भाजप)
५) बापर्डे ;अवनी अमोल तेली (भाजप)
६) पोंगुर्ले; अनुराधा महेश नारकर (भाजप)
७) किंजवडे-सावी गंगाराम लोके (भाजप)
८) कोळपे; प्रमोद पुंडलिक रावराणे (भाजप)

पंचायत समिती कणकवली (६ बिनविरोध)

१) वरवडे ; सोनू सावंत (भाजपा)
२) नांदगाव; हर्षदा हनुमंत वाळके (भाजप)
३) जाणवली महेश्वरी महेश चव्हाण (भाजप)
४) बिडवाडी; संजना संतोष राणे (भाजप)
५) हरकुळ बुद्रुक; दिव्या दिनकर पेडणेकर (भाजप)
६) नाटळ ; सायली संजय कृपाळ (भाजप)

देवगड तालुक्यातील पंचायत समिती (६ बिनविरोध)

१) पडेल –अंकुश यशवंत ठूकरूल (भाजप)
२) नाडण –गणेश सदाशिव राणे (भाजप)
३) बापर्डे – संजना संजय लाड (भाजप)
४) फणसगाव – समृद्धी संतोष चव्हाण (भाजप)
५) शिरगाव – शितल सुरेश तावडे (भाजप)
६) कोटकामते -ऋतुजा राकेश खाजनवाडकर (भाजप)

पंचायत समिती वैभववाडी(०१ बिनविरोध)

१) कोकिसरे; सौ.साधना सुधीर नकाशे (भाजप)

पंचायत समिती वेंगुर्ले (०१ बिनविरोध)

१) आसोली; संकेत धुरी (भाजप)

मालवण पंचायत समिती (०१ बिनविरोध)

१) अडवली मालडी; सीमा सतीश परुळेकर (भाजप)

सावंतवाडी पंचायत समिती (०१ बिनविरोध)

१) शेरले; महेश धुरी (भाजप)

दोडामार्ग पंचायत समिती (०१ बिनविरोध)

१) कोलझर; गणेश प्रसाद गवस (शिंदे सेना)

ताज्या बातम्या

महायुतीचे

ZP Election Results: राज्यातल्या मिनी विधानसभेवर कोणाची सत्ता? १०० जागांवर महायुतीचे...

0
मुंबई | Mumbaiराज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे.१२ जिल्हा परिषदेच्या ७३१ तर आणि पंचायत समित्यांच्या १ हजार...