Friday, May 3, 2024
Homeनाशिकजिल्हा नियोजन समितीकडून 'इतक्या' कोटींचा विकास आराखडा मंजूर

जिल्हा नियोजन समितीकडून ‘इतक्या’ कोटींचा विकास आराखडा मंजूर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा नियोजन समितीने ( District Planning Committee) 2023-2024 या आर्थिक वर्षासाठी सर्वसाधारण योजनेसाठी 501 कोटी 50 लाखांचा आराखडा मंजूर केला. वाढीव निधीसाठी राज्यस्तरीय बैठकीत पाठपुरावा केला जाईल, असे पालकमंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले. बैठकीत शहराला पडलेला अमली पदार्थार्ंचा विळखा कायमचा संपवण्याचा व येत्या महिनाभरात राजस्व अभियान व धर्मवीर आनंद दिघे महाआरोग्य अभियन यशस्वी करण्याचा निर्णय झाला. येत्या मार्चअखेरपर्यंत 65 टक्के निधी खर्चाचे आव्हान प्रशासनासमोेर असले तरी एक पैसाही परत जाणार नाही याची दक्षता घेण्याच्या सक्त सुचना देण्यात आल्या.

- Advertisement -

पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची काल बैठक झाली. या बैठकीत सर्वसाधारण योजनेसाठी 501 कोटी 50 लाख,आदिवासी उपयोजनेसाठी 293 कोटी, तर दलीत वस्ती सुधार योजनेसाठी 100 कोटीचा शासनाने दिलेल्या लक्ष्यांकानुसार आराखडा सादर करण्यात आला.राज्यस्तरीय बैठकीत आणखी 228 कोटीची वाढीव मागणी करण्यात येणार असल्याचे भुसे यांनी स्पष्ट केले.

आगामी वर्षात आरोग्यासाठी 37 कोटी 85 लाख, शाळा खोल्यांंसाठी 17 कोटी 65 लाख, रस्ते विकासासाठी 58 कोटी,ग्रामपंचायतींना विशेष सुविधांसाठी 25 कोटी,नगरोत्थान अभियानासाठी 26 कोटी, निसर्ग संरक्षणासाठी 22.5 कोटी, मृदा व ंजलसंधारणासाठी 22 कोटीे,पेसा योजनेसाठी 55 कोटी, महिला बालकल्याणासाठी 22.5 कोटी,आदिवासी विद्यार्थी माध्यमिक शिष्यवृत्तीसाठी 26 कोटी 90 लाख, दलित वस्तीमध्ये प्राथमिक सुविधांसााठी 32 कोटी रुपये उपलब्ध करुन देण्याचे निेयोजन केले.आगामी काळात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी 58 कोटी रुपये राखून ठेवले जाणार आहेत.

या चर्चेनंतर आ.देवयानी फरांदे यांनी नाशिकला पडलेल्या अमली पदार्थांच्या विळख्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले.शहरातील खूनसत्र,चोर्‍या,आत्महत्यांना या अंमली पदार्थांचा अतिरेक कारणीभूत असून याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली.त्यानंंतर येत्या विधानसभा अधिवेशनातही लक्षवेधी मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.त्यानंतर पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांना वेळीच यात लक्ष घालण्याच्या सुचना देण्यात आल्या.हिरामण खोसकर यांनी निधीचा वापर न करणार्‍या खात्यांंकडे लक्ष वेधले. जे खाते निधी वापरत नसतील त्यांनी वेळीच सांंंगावे व तो निधी इतर खात्याकडे वळवावा,अशी सुचना त्ंयांनी केली. त्यावर भुसे यांंनी सर्व खातेप्रमुुखांना मार्चच्या आत सर्व निधी खर्च करण्याच्या सुचना दिल्या.त्यानंंतर गावातील ट्रान्सफॉर्मर बंद असल्यास ते 48 तासांत दुरुस्त करण्यात यावे, या शासनाच्या आदेशानुसार ज्या ठिकाणी कार्यवाही होत नाही तेथे विलंब होण्याच्या कारणांची चौकशी करून त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांना सादर करावा.

अतिवृष्टी व सतत़च्या पावसामुळे शेतकर्‍यांना अनेक संकटाना सामोरे जावे लागलेे.त्यांना पीक विमा योजनेच्या माध्यमातून मिळणार्‍या लाभाची प्रलंबित प्रकरणे येत्या आठवड्यात निकाली काढावीत.भात पिकासाठी असणार्‍या शासनाचे धोरण व शेतकर्‍यांच्या मागणीनुसार पीक कापणी प्रयोग राबविण्यात यावेत,असे निर्देश भुसे यांनी दिले. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी वनपट्टे वाटप करण्यात आलेल्या शेतकर्‍यांना कृषी विभागाने फळबाग लागवडीकरीता आवश्यक ते सहाय्य करावे,असे सुचविले.ग्रामीण भागात विविध योजनांची अंमलबजावणी करतांना तेथे अखंडित वीजपुरवठा देण्यात यावा,असे ते म्हणाले.इतरआमदारांनी आपल्या भागात येणार्‍या अडचणी मांडल्या व अपेक्षित कार्यवाही करण्याची मागणी केली.

आगामी कुंभमेळ्याच्या भूसंपादनासाठी शासनाने महापालिकेला निधी द्यावा, असा प्रस्ताव दिला आहे.तपोवन भागात महापालिकेच्यावतीने अद्यावत हॉस्पिटल उभारावे, अशी मागणी लोकप्रतिनिधींच्या वतीने करण्यात आली.शहरातील उघड्या वीज तारा भूमिगत करण्यासाठी नियोजन समितीतून निधी द्यावा अशी मागणी आमदार सीमा हिरे, राहुल ढिकले यांनी केली. मनपाच्या मदतीने धर्मवीर आनंद दिघे महाआरोग्य शिबिर आणि शासन आपल्या दारी उपक्रम राबविण्यात येणार असून जनतेला त्यांच्याच घराजवळच्या परिसरात जागेवरच विविध दाखले, रेशनकार्ड उपलब्ध करून दिले जातील, अशी माहिती यावेळी ना. भुसें यांनी दिली.

शंभर शाळा मॉडेल करणे,महाराजस्व अभियान राबविणे, धर्मवीर आनंद दिघे महाआरोग्य अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.तसेच येत्या आठवडयात प्रशासकीय मान्यतां नियोजन करण्यास सांगीतले.कारण फेब्रुुवारीमध्ये महापालिका निवडणुका जाहीर झाल्या तर पुन्हा आचारसंहितेची अडचण येईल,असे यावेळी सांगण्यात आले.या चर्चेत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ,आ.राहुल आहेर, राहुल ढिकले,सीमा हिरे, दिलीप बोरसे,नितीन पवार आदी सहभागी झाले होते. या बैठकीपाठोपाठ पालकमंत्री भुसे यांना वार्षिक मूल्यदर तक्ते सन 2023-2024 शिफारशींबाबत,महाराजस्व अभियान,कालवा सल्लागार समिती यांच्या बैठका घेतल्या.

हार आणि प्रहार

आजच्या नियोजन समिती बैठकीत शहर पोलिसांंंवर प्रहार तर ग्रामीण पोलिसांना हार असे चित्र दिसले.आ.फरांंंदे यांनी अंमली पदार्थावरुन शहर पोलिसांना धारेवर धरले. तर ग्रामीण भागात अवैध धंद्याविरुध्द रान पेटविणार्‍या पोलिस अधीक्षक शहाजी उमप यांच्या कार्यावर आ.दिलीप बोरसे यांनी स्तुतीसुमने उधळली.त्यामुळेे एकाच बैठकीत गृह खात्याच्या कारभारावर हार आणि प्रहारचे दर्शऩ घडले.

- Advertisment -

ताज्या बातम्या