Thursday, March 27, 2025
Homeक्राईमतंबाखूची तस्करी रोखली; कंटेनरसह 67 लाखांचा मुद्देमाल जप्त

तंबाखूची तस्करी रोखली; कंटेनरसह 67 लाखांचा मुद्देमाल जप्त

हाडाखेड सीमा तपासणी नाक्यावर शिरपूर तालुका पोलिसांची कारवाई

धुळे । प्रतिनिधी– महाराष्ट्रात प्रतिबंधित हंस छाप तंबाखूची कंटेनरमधून होणारी तस्करी शिरपूर तालुका पोलिसांनी रोखली. 52 लाखांची तंबाखू आणि 15 लाखांचा कंटेनर असा एकूण 67 लाख 56 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई हाडाखेड सीमा तपासणी नाक्यावर करण्यात आली. चालकाला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मध्यप्रदेशातील सेंधवा येथून धुळ्याच्या दिशेने येणार्‍या एका कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटख्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ रात्रगस्तीवरील कर्मचार्‍यांना वाहनाचा शोध घेऊन कारवाईचे आदेश दिले.दि. 26 मार्च रोजी रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास हाडाखेड सीमा तपासणी नाका येथे पेट्रोलिंग करणार्‍या पोहेकॉ. संतोष पाटील, पोकॉ. स्वप्निल बांगर, धनराज गोपाळ व चालक पोहेकॉ. अलताफ मिर्झा यांना कंटेनर (क्र. एच आर 55 एए 8364) मिळून आला. वाहन चालक राजेंद्रसिंग सुरतसिंग (वय 51, रा. भली आनंदपूर, ता. कलानोर, जि. रोहतक, हरियाणा) याची चौकशी केली असता, त्याने वाहनात प्रतिबंधित माल असल्याची कबुली दिली.कंटेनर उघडून तपासणी केली असता, हंस छाप तंबाखूच्या 438 गोण्या मिळून आल्या. त्याची किंमत 52 लाख 56 हजार इतकी आहे. तसेच 15 लाखाचा कंटेनर असा मु्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुकांना कळवण्यात आले. अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार यांनी तपासणी करून हा माल महाराष्ट्रात प्रतिबंधित असल्याचे निष्कर्ष नोंदवले. त्यानुसार चालकाविरुद्ध शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोसई मिलींद पवार, पोहेकॉ. संतोष पाटील, अलताफ बेग, पोकॉ. स्वप्निल बांगर, योगेश मोरे, संजय भोई, धनराज गोपाळ, सुनिल पवार, रमेश माळी, जयेश मोरे, इसरार फारुकी यांच्या पथकाने केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

लोकसभेत स्थलांतर सुधारणा विधेयक मंजूर

0
दिल्ली । वृत्त्संसंस्था भारताच्या स्थलांतर कायद्यांचे आधुनिकीकरण आणि एकत्रीकरण करणाऱ्या प्रस्तावित कायद्यावरील चर्चेनंतर आज स्थलांतर आणि परदेशी नागरिक विधेयक - २०२५ मंजूर केले. केंद्रीय गृहमंत्री...