Monday, October 28, 2024
Homeधुळेधुळे जिल्ह्यात पाचव्या दिवशी 43 उमेदवारांचे 55 अर्ज दाखल

धुळे जिल्ह्यात पाचव्या दिवशी 43 उमेदवारांचे 55 अर्ज दाखल

विधानसभा निवडणूक 2024

धुळे : विधानसभा निवडणूकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या पाचव्या दिवशी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघासाठी 43 उमेदवारांनी 55 नामनिर्देशन पत्र दाखल केले. तर 39 व्यक्तींनी 60 नामनिर्देशन पत्र घेतल्याची माहिती निवडणुक शाखेमार्फत देण्यात आली आहे.

धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघाची अधिसूचना 22 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाली आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या पाचव्या दिवशी साक्री विधानसभा मतदार संघासाठी प्रविण बापू चौरे यांनी भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस, मोहन गोकुळ सुर्यवंशी यांनी अपक्ष, युवराज सखाराम ठाकरे यांनी अपक्ष, तुळशीराम बुधा गावीत यांनी शिवसेना व अपक्ष, कांतीलाल तुळशीराम सुर्यवंशी यांनी अपक्ष, रंजन ग्यानदेव गावीत यांनी अपक्ष, विजय माणिक ठाकरे यांनी अपक्ष, लीला मोहन सुर्यवंशी यांनी अपक्ष दोन अर्ज, अशोक राघो सोनवणे यांनी महाराष्ट्र स्वराज्य पक्ष, मिरा बाबुलाल शिंदे यांनी अपक्ष, गुलाब तानाजी पवार यांनी अपक्ष, रामलाल काळु गवळी यांनी शेतकरी कामगार पक्ष, यशवंत देवमन माळचे यांनी शेतकरी कामगार पक्ष, वसंत दोधा सुर्यवंशी यांनी भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस, धमेंद्र बारकु चौधरी यांनी अपक्ष, विजय अशोक चव्हाण यांनी अपक्ष असे एकूण 16 उमेदवारांनी 18 अर्ज दाखल केले आहेत.

- Advertisement -

धुळे ग्रामीण मतदार संघातून राजेंद्र भगवान पाटील यांनी अपक्ष, बाजीराव हिरामण पाटील यांनी इंडियन नॅशनल कॉग्रेस, यशवंत दामू खैरणार यांनी इंडियन नॅशनल कॉग्रेस, गुलाबराव धोंडू कातकर यांनी इंडियन नॅशनल कॉग्रेस, कुणाल रोहिदास पाटील यांनी इंडियन नॅशनल कॉग्रेस कडून तीन अर्ज, आनंद जयराम सैंदाणे यांनी बहुजन समाज पार्टी, राज हिलाल माळी यांनी अपक्ष असे एकूण 7 उमेदवारांनी 9 अर्ज दाखल केले आहे.

धुळे शहर विधानसभा मतदार संघातून गोरख बबनलाल शर्मा यांनी अपक्ष, अन्सारी रईस अहमद अब्दुल कादीर यांनी अपक्ष, इर्शाद फररुद्दीन जहागीरदार यांनी समाजवादी पार्टी व अपक्ष, आनंद जयराम सैंदाणे यांनी बहुजन समाज पार्टी, जितेंद्र उंदा शिरसाट यांनी वंचित बहुजन आघाडी, विनोद मंगा जगताप यांनी अपक्ष असे एकूण 6 उमेदवारांनी 7 अर्ज दाखल केले आहे.

शिंदखेडा विधानसभा मतदार संघात पवार हितेंद्र रमेश यांनी आम आदमी पार्टी व अपक्ष दोन अर्ज, दिपक दशरथ अहिरे यांनी अपक्ष, ज्ञानेश्वर आनंदराव भामरे यांनी नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी शरदचंद्र पवार व अपक्ष तीन अर्ज, भाऊसाहेब नामदेव पवार यांनी बहुजन समाज पार्टी, नामदेव रोहिदास येळवे यांनी अपक्ष, श्यामकांत रघुनाथ सनेर यांनी इंडियन नॅशनल कॉग्रेस व अपक्ष दोन अर्ज, गणेश वामन वाडिले यांनी भारतीय जनसम्राट पार्टी, दिनेश भटुसिंग जाधव यांनी अपक्ष असे एकूण 8 उमेदवारांनी 13 अर्ज दाखल केले आहे.

शिरपूर विधानसभा मतदार संघात काशिराम वेचाण पावरा यांनी भारतीय जनता पार्टी दोन अर्ज, दिपक मधुकर शिरसाट यांनी अपक्ष, जितेंद्र युवराज ठाकूर यांनी नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी शरदचंद्र पवार व अपक्ष दोन अर्ज, बुधा मला पावरा यांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, सतीलाल रतन पावरा यांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, गीताजंली शशिकांत कोळी यांनी अपक्ष असे एकूण 6 उमेदवारांनी 8 अर्ज दाखल केले आहे. तसेच नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आज पाचव्या दिवशी साक्री विधानसभा मतदार संघासाठी 8 व्यक्तींनी 12 अर्ज, धुळे ग्रामीण 6 व्यक्तींनी 7 अर्ज, धुळे शहर 11 व्यक्तींनी 18 अर्ज, शिंदखेडा 3 व्यक्तींनी 4 अर्ज तर शिरपूर मतदार संघासाठी 11 व्यक्तींनी 19 अर्ज असे एकूण पाच विधानसभा मतदार संघासाठी 39 व्यक्तींनी 60 अर्ज खरेदी केल्याची माहिती निवडणूक शाखेने दिली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या