Monday, April 14, 2025
Homeधुळेधुळ्यात ई-तिकिटांचा काळाबाजार; एकास अटक, साडे बारा लाखांची तिकिटे जप्त

धुळ्यात ई-तिकिटांचा काळाबाजार; एकास अटक, साडे बारा लाखांची तिकिटे जप्त

आरपीएफ धुळेची कारवाई; चाळीसगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

धुळे : प्रतिनिधी- रेल्वेच्या ई-तिकिटांचा अवैधरित्या काळाबाजार करणाऱ्या धुळ्यातील एकावर आरपीएफ पथकाने कारवाई केली आहे. संशयिताकडून एकूण १२ लाख ५३ हजार ८६० रुपये किंमतीची २९९ ई-तिकिटे जप्त करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध रेल्वे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेल्वेच्या सायबर सेल पुणे यांच्याकडून प्राप्त झालेल्या इनपुटनुसार, ‘Sayaji_1’ या धुळे शहरातील युजर आयडीवरून अनधिकृतरीत्या रेल्वे आरक्षण तिकिटांचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्त भुसावळ यांच्या आदेशावरून आरपीएफ चाळीसगाव निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली धुळे चौकीच्या पथकाने धुळे शहर पोलिसांच्या मदतीने छापा टाकला.त्यात राजेंद्र सयाजी गांगुर्डे (वय ३८, रा. नवजीवन नगर, धुळे) या संस्थेत आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या मोबाईल तपासणीत १९ आगामी प्रवासासाठीची व २८० संपलेल्या प्रवासासाठीची ई-तिकिटे सापडली, ज्यांची एकूण किंमत १२ लाख ५३ हजार रुपये आहे. हे तिकिटे त्याच्या मोबाईलद्वारे तयार करण्यात आली होती, ज्यात कोणताही आयआरसीटीसी एजंट परवाना नव्हता. दरम्यान चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे.

- Advertisement -

पोलिसांनी मोबाईल व दोन सिमकार्डसह सर्व तिकिटे जप्त केली आहेत. संशयित आरोपीविरुद्ध आरपीएफ चाळीसगाव पोलीस ठाण्यात रेल्वे कायदा १९८९ चे कलम १४३ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. काल रविवार असल्याने काही तांत्रिक अडचणींमुळे काही तिकिटे अद्याप ब्लॉक करण्यात आलेली नाहीत. ही प्रक्रिया आज सोमवारी (१४ एप्रिल) पूर्ण करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक उपनिरीक्षक राजेंद्र भामरे करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संगमनेर, पारनेरला झटका दिला, आता श्रीरामपूरसाठी थोडं थांबा

0
टिळकनगर |वार्ताहर| Tilaknagar लोकसभा निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला. पण त्यानंतर संगमनेर व पारनेरला दिलेला जोरदार झटका शेवटपर्यंत कायम विरोधकांच्या लक्षात राहील, असे स्पष्ट करतानाच आता...