Sunday, May 5, 2024
Homeराजकीयपंकजा मुंडे म्हणाल्या "प्रीतम मुंडेंना नाशिकमधून उभे करेल", मंत्री भुजबळ सल्ला देत...

पंकजा मुंडे म्हणाल्या “प्रीतम मुंडेंना नाशिकमधून उभे करेल”, मंत्री भुजबळ सल्ला देत म्हणाले, बीडमध्येच…

नाशिक | Nashik

लोकसभा निवडणुकांची (Loksabha Election) घोषणा होऊन पहिल्या टप्प्यातील मतदान (Voting) देखील पार पडले आहे. उद्या (दि.२६ एप्रिल) रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. मात्र, राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीचा अद्यापही काही जागांवरील तिढा सुटलेला नाही. त्यामुळे हा तिढा सुटणार कधी? असा सवाल दोन्ही आघाड्यांमधील नेत्यांकडून विचारला जात आहे. तर मविआचा नाशिक लोकसभेचा (Nashik Loksabha) उमेदवार जाहीर झाला तरी महायुतीचा (Mahayuti) उमेदवार घोषित झालेला नाही.

- Advertisement -

नाशिक लोकसभेसाठी महायुतीमधील शिंदेंच्या शिवसेनेकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांची नावे चर्चेत आहेत. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाले होते. परंतु, उमेदवारीला नाशिकमधील मराठा समाजाकडून विरोध होत असल्याने काही दिवसांपूर्वी भुजबळांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यानंतर नाशकातील ओबीसी संघटनांनी भुजबळांची भेट घेत त्यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी पुन्हा विचार करावा, असा आग्रह धरला होता. यानंतर भुजबळांनी माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीचा नाशिकच्या जागेचा दावा कायम असल्याचे म्हटले होते.

तर दुसरीकडे महायुतीमधील भाजप (BJP) देखील नाशिकच्या जागेसाठी आग्रही असून त्यांनी आपला दावा कायम असल्याचे म्हटले आहे. अशातच काल भाजपच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आपला उमेदवारी अर्ज भरल्यानंतर झालेल्या प्रचाराच्या जाहीर सभेत “प्रतीम मुंडे यांना मी नाशिकमधून उभी करेल” असे म्हटले होते. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चां रंगल्या असून यावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाष्य केले आहे.

मंत्री छगन भुजबळ काय म्हणाले?

पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलतांना मंत्री भुजबळ म्हणाले की, पंकजाताई मुंडे यांनी आपल्या स्वतःच्या निवडणुकीतच लक्ष घालावे. नाशिकमध्ये आमच्याकडे उमेदवार नाहीत असे नाही. खूप उमेदवार आहेत. पंकजा मुंडे यांनी स्वतः निवडून येणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे बीडमध्येच लक्ष घातलेलं चांगले राहील असे त्यांनी म्हटले. त्यामुळे नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीमधील दोन ओबीसी नेत्यांमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळत आहे.

पंकजा मुंडे काय म्हणाल्या होत्या?

“प्रीतम मुंडेंना मी विस्थापित करणार नाही असा शब्द दिला होता. मला तिकीट देऊ नका, असं म्हणूनच मी सगळीकडे गेले होते. मात्र, मला हे आता लक्षात आलं की, ही निवडणूक कशाची आहे. ताईचं (प्रीतम मुंडे) कुठेही अडणार नाही. त्यांना मी नाशिकमधून उभे करेल, तुम्ही काळजी करू नका. ताईचं राजकारण हे गोपीनाथ मुंडे साहेबांच्या पाश्चात होतं. पण मी मुंडे साहेब असताना त्यांचा हात बनले होते”, असं पंकजा मुंडे यांनी म्हटले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या