Friday, April 25, 2025
Homeक्राईमपिकांमध्ये लपवलेला 55 लाखांचा सुका गांजा जप्त

पिकांमध्ये लपवलेला 55 लाखांचा सुका गांजा जप्त

सांगवी वनक्षेत्रात वनविभाग व पोलिसांची संयुक्त कारवाई

धुळे (प्रतिनिधी) : सांगवी (ता.शिरपूर) परिसरातील अंबा नियतक्षेत्रातील कक्ष क्र. ८३३ मध्ये मका, ज्वारी, बाजरीच्या पिकात लपवून ठेवलेला सुमारे ११०० किलो सुका गांजा जप्त करण्यात आला. बाजारभावानुसार या मुद्देमालाची किंमत अंदाजे ५५ ते ६० लाख रुपये आहे. वनविभाग व पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.

सांगवी वनविभागातील परिमंडल खंबाला नियतक्षेत्र अंबा येथे कक्ष क्र.८३३ मध्ये वनरक्षक पवन पावरा हे आज, दि. ८ एप्रिल रोजी, नेहमीप्रमाणे गस्त घालत होते. तेव्हा त्यांना प्रलंबित वनदावा क्षेत्रात उभ्या असलेल्या मका पिकामध्ये संशय वाटल्याने त्यांनी त्या ठिकाणी तपासणी केली. तपासणीदरम्यान त्यांना प्लास्टिक ड्रम, पत्र्याची कोठी, गोण्या व कापडात बांधलेले गासोडे यामध्ये भरून ठेवलेला सुकवलेला गांजा आढळून आला.या घटनेची माहिती त्यांनी तत्काळ उपवनसंरक्षक नितीनकुमार सिंग यांना दिली. त्यांच्या आदेशावरून सहाय्यक वनसंरक्षक राहुल घरटे यांनी सांगवी पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. त्यानंतर पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस उपनिरीक्षक वसावे आणि कर्मचाऱ्यांसह, वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घट नास्थळी दाखल झाले. सखोल तपासाअंती सुमारे ११०० किलो गांजा जप्त करून सांगवी पोलीस ठाण्यात आणण्यात आला. त्याची किंमत बाजार भावप्रमाणे ५५ लाख लाख रुपये असल्याचा अंदाज आहे. दरम्यान हा मुद्देमाल कोणी साठवून ठेवला होता, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नसून, पोलीस अधिक तपास करीत आहेत. याप्रकरणी कायदेशीर कारवाई सुरु असून तपास सांगवी पोलीस करीत आहेत.

- Advertisement -

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपवनसंरक्षक नितीनकुमार सिंग, विभागीय वनअधिकारी, राजेंद्र सदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाई काशिनाथ देवरे (वनपरिक्षेत्र अधिकारी, सांगवी), बिपीन महाजन (वनपाल, पळासनेर), राजेंद्र शेटे (वनपाल, सांगवी), नितीन बेडसे (वनरक्षक, चोंदीनाला), नरेंद्र चित्ते (वनरक्षक, बिजासणी), आयोध्या नागपूर्णे, माधुरी परदेशी, विद्या ठाकरे, दानिल मावची (सर्व वनरक्षक), वाहन चालक साहेबराव तुंगार, संदीप ठाकरे आदींनी सहभाग घेतला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...